Dr. Nilesh Sable on Star Pravah: 'नमस्कार मी निलेश साबळे...', 'चला हवा येऊ द्या'च्या एक्स-होस्टची 'स्टार प्रवाह'वर दणक्यात एन्ट्री; प्रोमो पाहिलात?
Dr. Nilesh Sable on Star Pravah: 'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'शिट्टी वाजली रे' या धमाकेदार कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा येत्या 2 आणि 3 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. त्या सोहळ्यात निलेश साबळे दिसणार आहे.

Dr. Nilesh Sable on Star Pravah: महाराष्ट्रातल्या (Maharashtra) घराघरांत पोहोचलेला, प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करणारा कार्यक्रम म्हणजे, 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya). तब्बल 10 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर 2024 मध्ये या कार्यक्रमानं निरोप घेतला. पण, आता मराठमोळ्या कार्यक्रमाचं (Marathi Show) नवं पर्व येत्या 26 जुलैपासून झी मराठीवर (Zee Marathi) सुरू होणार आहे. पण, यंदाच्या पर्वात काही महत्त्वाचे बदल पाहायला मिळणार आहेत.
'चला हवा येऊ द्या'च्या यंदाच्या पर्वात शोचा कर्ताधर्ता आणि पहिल्यापासून या कार्यक्रमाची घडी ज्यानं बसवली, तो डॉ. निलेश साबळे (Dr. Nilesh Sabale) मात्र दिसणार नाही. हे कळल्यानंतर प्रचंड मोठा गोंधळ निर्माण झाला होता. वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या अखेर खुद्द डॉ. निलेश साबळेनं समोर येत, इतर कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे तो 'चला हवा येऊ द्या'मध्ये दिसणार नसल्याचं सांगितलेलं. अशातच आता निलेश साबळेनं सर्वांना सुखद धक्का दिला असून लवकरच तो, 'स्टार प्रवाह' (Star Pravah) वर झळकणार आहे. यासंदर्भातला प्रोमो स्टार प्रवाह वाहिनीनं शेअर केला आहे.
महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय झालेल्या 'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'शिट्टी वाजली रे' (Shitti Vajali Re) या धमाकेदार कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा येत्या 2 आणि 3 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. या 'ग्रँड फिनाले'मध्ये सेलिब्रिटी जोड्यांची धम्माल तर असणारच आहे, पण यासोबतच खास आकर्षण ठरणार आहे, महाराष्ट्राचा लाडका विनोदवीर आणि 'चला हवा येऊ द्या' फेम डॉ. निलेश साबळे याची 'विशेष हजेरी'. मराठी अभिनेता अमेय वाघ आणि सिद्धार्थ जाधव यांच्यासोबत निलेश साबळे महाअंतिम सोहळ्यात 'धिंगाणा' घालणार आहे. 'स्टार प्रवाह'नं शेअर केलेल्या प्रोमोमुळे शोबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
पहिल्यापासूनच निलेश साबळे झी मराठीसोबत जोडला गेला होता. अशातच आता निलेश साबळे 'शिट्टी वाजली रे' कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्यासाठी स्टार प्रवाहसोबत जोडला जाणार आहे, त्यामुळे त्याचा उत्साह द्विगुणित झाला आहेच, पण तो स्वतःही याबाबत प्रचंड उत्साही आहे.
View this post on Instagram
निलेश साबळे काय म्हणाला?
'शिट्टी वाजली रे' च्या मंचावरच्या आपल्या अनुभवाबद्दल बोलताना निलेश साबळे म्हणाला, "स्टार प्रवाहचे अनेक कार्यक्रम मी नेहमीच पाहिले आहेत. 'आता होऊ दे धिंगाणा' आणि 'शिट्टी वाजली रे' हे दोन्ही कार्यक्रम माझ्या आवडीचे आहेत. स्टार प्रवाहनं इतक्या आपुलकीनं आणि प्रेमानं जेव्हा या कार्यक्रमासाठी मला विचारलं, तेव्हा 'नाही' म्हणायचं काही कारणच नव्हतं."
यावेळी बोलताना निलेश साबळेनं शुटिंग सेटवरच्या काही गमतीजमतीही सांगितल्या. "शिट्टी वाजली रे' च्या मंचावरचा दिवस माझ्यासाठी अतिशय मजेशीर ठरला. मला स्वयंपाक बनवता येत नाही, पण माझ्यासोबत अभिनेत्री सुपर्णा श्याम होती, तिच्या साथीनं मी पदार्थ बनवू शकलो." 'स्टार प्रवाह'च्या कुटुंबात प्रवेश मिळाल्याचा आनंद त्यानं मोठ्या उत्साहात व्यक्त केला, "स्टार प्रवाहच्या कुटुंबात माझा प्रवेश झालाय, त्यामुळे अतिशय आनंद होतोय!", असंही तो म्हणाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























