(Source: ECI/ABP News/ABP Majha)
World Music Day 2023 : लता मंगेशकर ते अजय अतुल; हिंदी चित्रपट संगीतामध्ये ठसा उमटवणारे मराठी संगीतकार, गीतकार, गायकांबद्दल जाणून घ्या...
World Music Day : मराठी संगीतकार, गीतकार आणि गायक यांनी हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केलं आहे.
World Music Day 2023 : लहान मुलांपासून ते वयोवद्धांपर्यंत सर्वांनाच संगीताची आवड असते. ताणतणाव कमी करण्यात संगीताची मोठी मदत होते. 'संगीत' या शब्दातील 'सं' म्हणजे स्वर, 'गी' म्हणजे गीत आणि 'त' म्हणजे ताल होय. संगीत कला ही सर्व कलांमध्ये श्रेष्ठ मानली जाते. अनेक मराठी संगीतकार, गीतकार आणि गायक यांनी हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केलं आहे. आज जागतिक संगीत दिनानिमित्त (World Music Day 2023) हिंदी सिनेसृष्टीत आपल्या संगीताने समृद्ध करणाऱ्या संगीतकार, गीतकार आणि गायकांबद्दल जाणून घ्या...
लता मंगेशकर (Lata Mangeshkar) : लता मंगेशकर या भारतीय गायिका आणि संगीतकार होत्या. भारतीय संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना 'भारतीय गानकोकिळा' ही पदवी देण्यात आली. लता दीदींनी 36 भाषांमध्ये पाच हजारपेक्षा अधिक गाणी गायली आहेत. अजीब दास्तां है ये, पिया तोसे नैना लागे रे, मेरा दिल ये पुकारे आ जा, लो चली मैं अपनी देवर की बारात ले के, जिया जले जाँ जले आणि मेरी आवाज ही पहचान है, अशी त्यांची अनेक हिंदी गाणी सुपरहिट ठरली आहेत.
अजय - अतुल (Atul Gogavale Ajay Gogavale) : अजय-अतुल ही सध्या मराठीसह हिंदी संगीतक्षेत्रातील आघाडीची संगीतकार जोडी आहे. हिंदी सिनेमांच्या संगीत दिग्दर्शनाची धुरादेखील ते सांभाळत आहेत.
सुधीर फडके (Sudhir Phadke) : संगीतकार, गायक सुधीर फडके यांनी तब्बल 50 वर्षे मनोरंजनसृष्टीवर राज्य केले आहे. त्यांची भक्तीगीते आणि चित्रपट गीते खूपच लोकप्रिय आहेत.'ज्योती कलश छलके', 'खुश है जमाना आज पहली तारीख है' ही त्यांची हिंदी गाणी खूपच लोकप्रिय झाली.
अशोक पत्की (Ashok Patki) : अशोक पत्की यांनी मराठीसह हिंदी सिनेमांना संगीत दिलं आहे. मम्मो, सरदारी बेगम अशा अनेक हिंदी सिनेमांतील गाणी अशोक पत्की यांनी गायली आहे. सुमन कल्याणपूर यांचं 'नाविका रे वारा वाहे रे' हे पहिलं गाणं त्यांनी संगीतबद्ध केलं आहे.
अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) : मराठमोळा गायक, संगीतकार अवधूत गुप्तेने अनेक हिंदी गाण्यांचंदेखील पार्श्वगायन केलं आहे.
हृदयनाथ मंगेशकर : हृदयनाथ मंगेशकर हे लोकप्रिय संगीतकार आहेत. माया मेमसाब, हरीशचंद्र तारामती, लाल सलाम, मशाल आणि प्रार्थनासारख्या बॉलिवूड सिनेमातील गाणी त्यांनी संगीतबद्ध केली आहेत.
संबंधित बातम्या