एक्स्प्लोर

Panghrun Movie : अखेर प्रतिक्षा संपली, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'पांघरूण'

Panghrun Movie : 18व्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल, 28व्या ऑस्टिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, मामी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये ‘पांघरुण’ चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली.

Panghrun Movie : आपल्या सुमधुर संगीतामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांचे दिग्दर्शन असलेला आणि झी स्टुडिओजची प्रस्तुती असलेला 'पांघरुण' हा चित्रपट येत्या 4 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अमोल बावडेकर (Amol Bavdekar) , गौरी इंगवले(Gauri Ingawale), रोहित फाळके (Rohit Phalke), विद्याधर जोशी (Vidyadhar Joshi) , सुरेखा तळवलकर (Sulekha Talwalkar) हे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

महेश मांजरेकर आणि झी स्टुडिओज यांच्या यशाचं एक वेगळं समीकरण आहे. ‘काकस्पर्श’, ‘नटसम्राट’ यांसारख्या उत्तमोत्तम आणि यशस्वी कलाकृती हे याचं उदाहरण. आता हेच समीकरण पांघरुणमधूनही प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. स्वातंत्र्यपूर्वीचा काळ, कोकणाचं निसर्गसौंदर्य आणि तिथे घडणारी एक विलक्षण प्रेमकहाणी यामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  या चित्रपटाचा सांगितिक ट्रेलरला (म्युझिकल ट्रेलर) प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. हितेश मोडक, डॉ. सलील कुलकर्णी, पवनदीप राजन आणि अजित परब यांचं संगीत आणि वैभव जोशी यांच्या शब्दांनी सजलेल्या या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. चित्रपटातील 'ही अनोखी गाठ' आणि 'इलुसा हा देह' या गाण्यांना तर सोशल मीडियावर लाखो व्ह्यूव्ज मिळाले.

अनेक पुरस्कारांवर कोरलेय नाव

अनेक चित्रपट महोत्सवासाठीही या चित्रपटाची निवड झाली. 18व्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल, 28व्या ऑस्टिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, मामी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये ‘पांघरुण’ चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. बंगळुरु आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रभारती इंडियन सिनेमा कॉम्पिटेशन या विभागात सर्वोकृष्ट भारतीय चित्रपट हा मानाचा पुरस्कारही पांघरुणने पटकावला.

नव्या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले की , "एखादी कलाकृती अशी असते की ती त्या दिग्दर्शकासाठी अतिशय जवळची असते. माझ्यासाठी ‘पांघरुण’ ही तशीच अतिशय जवळची फिल्म आहे. एखादी कथा प्रेक्षकांच्या आवर्जून भेटीस यावी असं अनेकदा वाटत असतं. पांघरुण ही तशीच कथा आहे. जी प्रत्येकाला आवडेल, भावेल आणि बघणारा या कथेच्या प्रेमात पडेल. अमोल, गौरी आणि रोहित यांनी कमालीच्या सुंदर भूमिका अतिशय समजून उमजून साकारल्या आहेत. प्रेक्षकांइतकाच मीही या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकतेने वाट बघत आहे." येत्या 4 फेब्रुवारीला ‘पांघरुण’ संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Embed widget