Sholay: जय, विरु आणि बसंती यांच्या 'शोले'ची निर्मिती जर हॉलिवूडमध्ये झाली असती तर? हा व्हिडीओ एकदा बघाच
नुकताच शोले (Sholay) चित्रपटाच्या संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Sholay: शोले (Sholay) हा अनेक प्रेक्षकांचा ऑलटाइम फेवरेट चित्रपट आहे.या चित्रपटातील प्रत्येक गाणे आणि अॅक्शन सीन्सने प्रेक्षकांची मनं जिंकली. 'कितने आदमी थे?' ते 'बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना' , 'पचास पचास कोस जब बच्चा रोता है तब उसकी मां उसे ’'बेटा चुप हो जा नही तो गब्बर आ जायेगा’ या शोले चित्रपटामधील डायलॉग्सला प्रेक्षकांची विशेष लोकप्रियता मिळाली.नुकताच शोले चित्रपटाच्या संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एआयचा वापर करुन तयार करण्यात आला आहे.
शोले चित्रपटाच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर लिहिलं आहे, जर 'शोले'ची निर्मिती जर हॉलिवूडमध्ये झाली असती तर? या व्हिडीओमध्ये हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट डी नीरो (Robert De Niro) हा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी साकारलेल्या जय या भूमिकेत दिसत आहे तर अभिनेता अल पचिनो (Al Pacino) हा धर्मेंद्र (Dharmendra) यांनी साकारलेल्या वीरू या भूमिकेत आहे.
व्हिडीओमध्ये दिसत आहे, अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्स ही हेमा मालिनी यांनी साकारलेल्या बसंती या भूमिकेत दिसत आहे. तसेच अभिनेता केविन स्पेसी हा ठाकूर बलदेव सिंहची या भूमिकेत दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
जाणून घ्या शोले चित्रपटाबद्दल
1975 मध्ये शोले हा चित्रपट रिलीज झाला होता.रमेश सिप्पी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटात अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, धर्मेंद्र, संजीव कुमार, ए.के. हंगल, जया भादुरी, सत्येन कप्पू आणि अमजदखा यांनी प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटामधील ये दोस्ती हम नाही तोडेंगे,जब तक है जान आणि मेहबूबा मेहबूबा या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. अनेक प्रेक्षक आजही हा चित्रपट आवडीनं बघतात. या चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाचं देखील अनेकांनी कौतुक केलं. शोले हा चित्रपट बॉलिवूडमधील एक आयकॉनिक चित्रपट म्हणून ओळखला जातो.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
संजीव कुमार यांच्याआधी 'या' अभिनेत्याला करायची होती 'ठाकूर'ची भूमिका; नाव ऐकून थक्क व्हाल