Katrina Kaif Vicky Kaushal Wedding : विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल विकीच्या बहिणीने दिली माहिती; म्हणाली...
अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.
Katrina Kaif Vicky Kaushal Wedding : अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. कुटुंबातील काही निवडक व्यक्ती आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत राजस्थानमध्ये कतरिना आणि विकी लग्न करणार आहेत, असं म्हटले जात होते. आता या सर्व गोष्टींबद्दल विकी कौशलची चुलत बहीण उपासना वोहराने (Upasana Vohra) नुकतीच माहिती दिली आहे. तिने या सर्व गोष्टी अफवा आहेत, असं म्हटलंय
उपसना वोहरा यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं, 'लग्नाची तयारी तसेच लग्न सोहळा कुठे होणार? या सर्व गोष्टींबद्दल सोशल मीडियावर अफवा पसरवण्यात येत आहेत. लग्न तर होत नहिये, पण लग्नाची माहिती मात्र सर्वांना आहे. बॉलिवूडमधील कलाकारांबद्दल अशा अफवा नेहमी पसरत असतात. या अफवांच्या चर्चा थोडेच दिवस सुरू राहतात. नुकतेच माझे माझ्या भावासोबत (विकी कौशल) बोलणे झाले. मी अजून तरी या गोष्टींवर काही कमेंट करू ईच्छित नाही.' उपसना वोहरा यांचे लग्न जुलै महिन्यात झाले. उपासना सोशल मीडियावर विकीसोबतचे फोटो नेहमी शेअर करत असतात
View this post on Instagram
Box Office Report: बॉक्स ऑफिसवर सूर्यवंशीचा धमाका; 'बंटी और बबली 2' ची निराशा
18 ऑगस्ट रोजी विकी आणि कतरिनाच्या साखपुडा झाला, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. आता त्याच्या लग्नाबद्दल देखील सोशल मीडियावर अनेक जण पोस्ट करत आहेत. पण अजूनही लग्नाबाबत आणि साखरपुड्याबाबत विकीने आणि कतरिनाने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.