![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Asha Parekh Love Story : आशा पारेख यांची अधुरी प्रेम कहाणी; विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडल्या अन् आयुष्यभर राहिल्या अविवाहित
Asha Parekh : आशा पारेख यांची प्रेम कहाणी अपूर्ण राहिली आहे.
![Asha Parekh Love Story : आशा पारेख यांची अधुरी प्रेम कहाणी; विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडल्या अन् आयुष्यभर राहिल्या अविवाहित veteran actress Asha Parekh Love Story and relationship with Nasir Hussain know About actress Movies And entertainment Latest update Asha Parekh Love Story : आशा पारेख यांची अधुरी प्रेम कहाणी; विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडल्या अन् आयुष्यभर राहिल्या अविवाहित](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/02/d5777988a1165e17e152919edafcf79e1696231811533254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Asha Parekh Love Life : सिने-अभिनेत्री आशा पारेख (Asha Parekh) यांचा आज वाढदिवस आहे. आज त्या हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. सिनेसृष्टीतील त्यांचं योगदान लक्षात घेत त्यांना 'दादासाहेब फाळके' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पण वैयक्तिक आयुष्यामुळे मात्र त्या कायम चर्चेत राहिल्या आहेत. त्यांची प्रेम कहाणी अपूर्ण राहिली आहे.
आशा पारेख यांनी लग्न केलेलं नसून त्या एकट्या आयुष्य जगत आहेत. आशा यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं होतं. माझं लग्न झालेलं नाही या गोष्टीचं मला कधीही वाईट वाटलं नाही. लग्न हे माझ्या नशीबातचं नसेल. लग्न, संसार आणि आईपणाची मला आवड होती. पण त्या गोष्टी न घडल्याचं मला वाईट वाटत नाही.
आशा पारेख यांना सिनेप्रवासात यश मिळालं असलं तरी वैयक्तिक आयुष्यात मात्र त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला आहे. आशा पारेख यांनी 1959 मध्ये 'दिल दे के देखो' या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शक नासिर हुसैन यांच्याच प्रेमात त्या पडल्या.
'या' कारणाने आशा पारेख यांनी अविवाहित राहण्याचा घेतला निर्णय
नासिर हुसैन यांनी 'तिसरी मंजिल', 'फिर वही दिल लाया हूँ' अशा शानदार सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. पुढे 'दिल दे के देखो' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान आशा आणि नासिर एकमेकांच्या प्रेमात पडले. नासिर यांचं लग्न झाल्याने त्यांनी हे नातं पुढे जाऊ दिलं नाही. नारिस यांचं लग्न झाल्याने संसार मोडू नये, अशी आशा यांची इच्छा होती. तसेच 'दुसरी पत्नी' हा टॅगही त्यांना नको होता. त्यामुळे त्यांनी आयुष्यभर अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला.
आशा पारेख यांचा सिनेप्रवास जाणून घ्या... (Asha Parekh Movies)
आशा पारेख यांनी 95 पेक्षा अधिक सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 'जब प्यार किसी से होता है','फिर वही दिल लाया हूँ','मेरे सनम','तिसरी मंजिल','बहरों के सपने','शिकार','प्यार का मौसम','कटी पतंग' आणि 'कारवां' अशा अनेक सुपरहिट सिनेमांचा आशा पारेख भाग आहेत. 'खत लिख दे सांवरिया के नाम बाबू','ये मेरी जिंदगी'सारखी गाणीदेखील त्यांनी गायली आहेत.
संबंधित बातम्या
'चित्रपटामधील हिरोंना तुमची भिती वाटत होती?' आशा पारेख आणि झीनत अमान यांनी दिलं उत्तर, जुन्या आठवणींना दिला उजाळा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)