एक्स्प्लोर

Vaani Kapoor Accident In Jaipur: प्रसिद्ध अभिनेत्रीचा जयपूरमध्ये शुटिंगदरम्यान अपघात; स्कुटीची पोलिसांच्या गाडीला जोरदार धडक

Vaani Kapoor Accident In Jaipur: जयपूरमध्ये शुटिंग दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्रीचा अपघात. शुटिंगवेळी स्कुटी थेट पोलिसांच्या गाडीवर जाऊन आदळली.

Vaani Kapoor Accident In Jaipur: बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरचा जयपूरमध्ये अपघात झाल्यची माहिती मिळत आहे. वाणी तिच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगसाठी जयपूरमध्ये आली होती. वाणी कपूर परकोटाच्या बापू बाजारात फिरतानाचं शुटिंग करत होती. त्यावेळी तिची स्कुटी शेजारी उभ्या असलेल्या पोलिसांच्या गाडीवर जाऊन आदळली. महत्त्वाची बाब म्हणजे, या अपघातात अभिनेत्रीला कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटात वाणी स्कुटीवरुन एका बाजारात जात असल्याचा सीन आहे. त्यासाठी वाणी कपूर स्कुटर चालवण्याचा सराव करत होती. त्यानंतर वाणीच्या स्कुटरची पोलिसांच्या गाडीला धडक बसली. मात्र, चित्रपटाच्या टीमनं लगेच वाणीची जबाबदारी स्विकारली. तिला कोणतीही दुखापत झालेली नाही. 

'अबीर गुलाल'चं शुटिंग सुरू, फवाद खान हिरो 

वाणी कपूर ज्या चित्रपटासाठी शुटिंग करत होती, त्याचं नाव 'अबीर गुलाल' असल्याचं सांगितलं जात आहे. यात पाकिस्तानी अभिनेता फवाद खानही दिसणार आहे. फवाद लवकरच जयपूरला येऊन त्याचे सीन शूट करणार आहे. 18 नोव्हेंबरला जयपूरमधील शिवविलास हॉटेलमध्ये चित्रपटाचे काही सीन शूट होणार असल्याचं समोर आलं आहे.                 

वाणी कपूरचं जयपूरशी कनेक्शन

जयपूरशी वाणी कपूरचं जुनं नातं आहे. तिच्या पहिल्या चित्रपटाचं शूटिंगही जयपूरमध्ये झालं होतं. वाणी कपूरचा पहिला चित्रपट 'शुद्ध देसी रोमान्स' होता, जो 2013 साली प्रदर्शित झाला होता. यात सुशांत सिंह राजपूत आणि परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत झळकले होते. इतकंच नाही तर टुरिझममध्ये बॅचलर डिग्री पूर्ण केल्यानंतर अभिनेत्रीनं जयपूरमधील ओबेरॉय हॉटेल्समध्ये इंटर्नशिप केली होती. यापूर्वी वाणी 'खेल खेल में' चित्रपटात दिसली होती.                 

आरती एस बागरी दिग्दर्शित 'अबीर गुलाल'ची निर्मिती विवेक बी अग्रवाल, राकेश सिप्पी आणि अवंतिकी हरी करत आहेत. या चित्रपटाचं शुटिंग सुरू झालं आहे. या कथेबद्दल बोलताना चित्रपटाच्या दिग्दर्शकानं सांगितलं की, नकळत एकमेकांना मदत करणाऱ्या आणि प्रेमात पडणाऱ्या दोन व्यक्तींची ही कथा आहे. मात्र, या चित्रपटाशी संबंधित फवाद खान आणि वाणी कपूरचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.           

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

"इतकी वर्ष लोटली...", जेव्हा ऐश्वर्या अन् अभिषेकच्या लग्नावर बोललेला सलमान खान; घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान 'तो' VIDEO Viral

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate on Rohit Pawar: मला कृषीमंत्रीपद गमवावं लागलं, रोहित पवारांकडे 'तो' व्हिडीओ कुठून आला? न्यायालयात माणिकराव कोकाटेंचा युक्तिवाद; चौकशीची मागणी
मला कृषीमंत्रीपद गमवावं लागलं, रोहित पवारांकडे 'तो' व्हिडीओ कुठून आला? न्यायालयात माणिकराव कोकाटेंचा युक्तिवाद; चौकशीची मागणी
Gopichand Padalkar : बीडच्या जेलमध्ये बायबलचे श्लोक, धर्मांतरणासाठी लाखो रुपयांची ऑफर; गोपीचंद पडळकरांचा जेलरवर आरोप
बीडच्या जेलमध्ये बायबलचे श्लोक, धर्मांतरणासाठी लाखो रुपयांची ऑफर; गोपीचंद पडळकरांचा जेलरवर आरोप
Nashik Crime News : नाशिकमध्ये बॅनरबाजी करत इन्स्टावर 'दबंगगिरी' करणाऱ्या सराईतांना पोलिसांचा दणका; गुंडांच्या सोशल मिडीयावरही 'स्ट्राईक'
नाशिकमध्ये बॅनरबाजी करत इन्स्टावर 'दबंगगिरी' करणाऱ्या सराईतांना पोलिसांचा दणका; गुंडांच्या सोशल मिडीयावरही 'स्ट्राईक'
Bihar Election Dates : बिहारच्या निवडणुका दोन टप्प्यात, 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी मतदान, तर 14 नोव्हेंबर रोजी निकाल, किती कोटी मतदार मतदान करणार?
बिहारच्या निवडणुका दोन टप्प्यात, 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी मतदान, तर 14 नोव्हेंबर रोजी निकाल, किती कोटी मतदार मतदान करणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

TOP 25 Superfast News : टॉप 25 बातम्या : ABP Majha : Maharashtra News
Rohini Khadse : रोहिणी खडसे यांची दीड तास अंमली पदार्थविरोधी विभागाकडून चौकशी
Maharashtra LIVE : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर 06 ऑक्टोबर 2025
Nilesh Ghaiwal घायवळच्या घराची झडती, वेगवेगळ्या ठिकाणी खरेदी केलेली कागदपत्रे,पासबूक आढळली
Nilesh Ghaiwal : निलेश घायवळला आमदार चंद्रकांत पाटलांचे आशीर्वाद, रवींद्र धंगेकरांचे आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate on Rohit Pawar: मला कृषीमंत्रीपद गमवावं लागलं, रोहित पवारांकडे 'तो' व्हिडीओ कुठून आला? न्यायालयात माणिकराव कोकाटेंचा युक्तिवाद; चौकशीची मागणी
मला कृषीमंत्रीपद गमवावं लागलं, रोहित पवारांकडे 'तो' व्हिडीओ कुठून आला? न्यायालयात माणिकराव कोकाटेंचा युक्तिवाद; चौकशीची मागणी
Gopichand Padalkar : बीडच्या जेलमध्ये बायबलचे श्लोक, धर्मांतरणासाठी लाखो रुपयांची ऑफर; गोपीचंद पडळकरांचा जेलरवर आरोप
बीडच्या जेलमध्ये बायबलचे श्लोक, धर्मांतरणासाठी लाखो रुपयांची ऑफर; गोपीचंद पडळकरांचा जेलरवर आरोप
Nashik Crime News : नाशिकमध्ये बॅनरबाजी करत इन्स्टावर 'दबंगगिरी' करणाऱ्या सराईतांना पोलिसांचा दणका; गुंडांच्या सोशल मिडीयावरही 'स्ट्राईक'
नाशिकमध्ये बॅनरबाजी करत इन्स्टावर 'दबंगगिरी' करणाऱ्या सराईतांना पोलिसांचा दणका; गुंडांच्या सोशल मिडीयावरही 'स्ट्राईक'
Bihar Election Dates : बिहारच्या निवडणुका दोन टप्प्यात, 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी मतदान, तर 14 नोव्हेंबर रोजी निकाल, किती कोटी मतदार मतदान करणार?
बिहारच्या निवडणुका दोन टप्प्यात, 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी मतदान, तर 14 नोव्हेंबर रोजी निकाल, किती कोटी मतदार मतदान करणार?
Wrong UPI Transfer Refund : पैसे चुकीच्या यूपीआय अन् बँक खात्यात गेल्यास परत कसे मिळवायचे? 'या' मार्गाचा वापर करा अन् पैसे परत मिळवा
पैसे पाठवताना चुकीच्या यूपीआय अन् बँक खात्यात गेल्यास परत कसे मिळवायचे? टेन्शन घेऊ नका या मार्गांचा वापर करा
Bihar Election 2025: मतदारयादीचं शुद्धीकरण केलं, बिहार निवडणूक पारदर्शक होणार, निवडणुकीच्या 10 दिवस आधीपर्यंत नावे जोडता येतील, ओळखपत्रही मिळेल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार
मतदारयादीचं शुद्धीकरण केलं, बिहार निवडणूक पारदर्शक होणार, निवडणुकीच्या 10 दिवस आधीपर्यंत नावे जोडता येतील, ओळखपत्रही मिळेल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार
थेट सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करताना हल्ल्याचा प्रयत्न; सरन्यायाधीश भूषण गवई यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
थेट सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करताना हल्ल्याचा प्रयत्न; सरन्यायाधीश भूषण गवई यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
Nagarpanchayat Election Reservation: लागा तयारीला! नगरपरिषद अन् नगरपंचायतीचं आरक्षण जाहीर, नागपूरच्या उमरेड अन् काटोल महिला OBC प्रवर्गासाठी राखीव; पाहा संपूर्ण यादी!
लागा तयारीला! नगरपरिषद अन् नगरपंचायतीचं आरक्षण जाहीर, नागपूरच्या उमरेड अन् काटोल महिला OBC प्रवर्गासाठी राखीव; पाहा संपूर्ण यादी!
Embed widget