Urfi Javed Dance Video : पुष्पाची क्रेझ; Oo Antava गाण्यावर उर्फीचा डान्स
Urfi Javed Video: उर्फी जावेद सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. आता तिने समंथाच्या आयटम साँगवर डान्स केला आहे.
Urfi Javed Video : अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा' (Pushpa) चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचे एक आयटम साँग आहे. आता इंटरनेट स्टार उर्फी जावेदने (Urfi Javed) या गाण्यावर डान्स केला आहे. तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उर्फी तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. पण उर्फीचा हा डान्स व्हिडीओ पाहून तिचे चाहते मात्र हैराण झाले आहेत.
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाची सगळीकडेच चर्चा सुरू आहे. सिनेमात समथांने Oo Antava या गाण्यावर डान्स केला आहे. आता उर्फी जावेद या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. उर्फीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये ती डान्स करताना दिसत आहे.
उर्फीने दिली समंथाला टक्कर
व्हिडीओमध्ये उर्फी समंथाला टक्कर देताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले आहे, यावर एक रील पोस्ट करायची होती, पण नको. मी नृत्यांगना नाही. व्हिडीओमध्ये उर्फीने बरगंडी रंगाची साडी नेसली आहे.
View this post on Instagram
चाहत्यांनी केली कमेंट
उर्फीच्या डान्स व्हिडीओवर तिचे चाहते कमेंट करत आहेत. काही मिनिटांतच या व्हिडीओला हजारो लाईक्स मिळाले आहेत.
संबंधित बातम्या
Shahrukh Khan : शाहरुख खानने इजिप्तच्या चाहत्याचे मानले आभार, नेमकं काय आहे कारण?
Navya Naveli Nanda : ‘बिग बीं’च्या नातीचा साडी लूक पाहून चाहते झाले घायाळ, ‘मामू’ अभिषेकनेही केले कौतुक!
Squid Game 2 : काय म्हणता!! ‘स्क्विड गेम’चा सीझन 2 येणार? नेटफ्लिक्सच्या CEOकडून मोठी अपडेट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha