एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Upcoming Movies : सिनेप्रेक्षकांसाठी 2023 वर्ष ठरणार खास; जाणून घ्या जानेवारी ते डिसेंबरपर्यंत कोणते बिग बजेट सिनेमे होणार रिलीज...

New Year 2023 : विविध विषयांवर भाष्य करणारे सिनेमे नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Upcoming Movies In 2023 : 2022 या वर्षात दाक्षिणात्य सिनेमांचा (Movies) दबदबा पाहायला मिळाला. भारतीय बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य सिनेमांनी रेकॉर्डब्रेक कमाई केली. बॉलिवूडसाठी मात्र हे वर्ष खास ठरलं नाही. पण येत्या वर्षात बॉलिवूडला सुगीचे दिवस येऊ शकतात. बॉलिवूडकर सध्या सिनेप्रेक्षकांना आपल्या सिनेमाकडे वळवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. नव्या वर्षात कोणते सिनेमे प्रदर्शित होणार जाणून घ्या...

कुत्ते (Kuttey) :
कधी प्रदर्शित होणार? 13 जानेवारी 

विशाल भारद्वाजचा लेक म्हणजेच आसमान भारद्वाजचा आगामी 'कुत्ते' हा सिनेमा नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा 13 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अर्जुन कपूर, तब्बू, नसीरुद्दीन शाह, कोंकणा सेन शर्मा मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 

मिशन मजनू (Mission Majnu) : 
कधी प्रदर्शित होणार? 20 जानेवारी

'मिशन मजनू' हा सिनेमा 20 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्राच्या अभिनयाची जादू पाहायला मिळणार आहे. देशभक्तीवर आधारित या सिनेमात अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. 

पठाण (Pathaan) : 
कधी प्रदर्शित होणार? 25 जानेवारी

शाहरुख खानचा बहुचर्चित 'पठाण' हा सिनेमा 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. शाहरुखसह या सिनेमात दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 

शहजादा (Shehzada) : 
कधी प्रदर्शित होणार? 10 फेब्रुवारी

रोहित धवनचा आगामी 'शहजादा' हा सिनेमा 10 फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात कार्तिक आर्यन, परेश रावल, कृती सेनन मुख्य भूमिकेत आहेत. 

मैदान (Maidaan) : 
कधी प्रदर्शित होणार? 17 फेब्रुवारी

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा आगामी 'मैदान' हा सिनेमा 17 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा सैय्यद अब्दुल रहीम यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. अमित शर्माने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 

सेल्फी (Selfiee) : 
कधी प्रदर्शित होणार? 24 फेब्रुवारी

अक्षय कुमार आणि इशरान हाशमीचा 'सेल्फी' हा सिनेमा 24 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे (Mrs Chatterjee Vs Norway) : 
कधी प्रदर्शित होणार? 3 मार्च

'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' हा सिनेमा 3 मार्च 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात रानी मुखर्जी मुख्य भूमिकेत आहे. आशिमा छिब्बरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

तू झूठी, मैं मक्कार (Tu Jhoothi Main Makkaar) : 
कधी प्रदर्शित होणार? 8 मार्च

'तू झूठी, मैं मक्कार' या सिनेमाच्या माध्यमातून लव रंजन कमबॅक करत आहेत. या सिनेमात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहेत. 8 मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

भोला (Bholaa) : 
कधी प्रदर्शित होणार? 30 मार्च

अजय देवगणचा आगामी 'भोला' हा सिनेमा 30 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अजय देवगणसोबत तब्बू स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. सध्या या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. 

बवाल (Bawaal) : 
कधी प्रदर्शित होणार? 7 एप्रिल

वरुण धवनचा आगामी 'बवाल' हा सिनेमा 7 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात वरुणसोबत जान्हवी कपूर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. नितेश तिवारीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) : 
कधी प्रदर्शित होणार? 21 एप्रिल 

सलमान खानचा आगामी 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा 21 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात प्रेक्षकांना थरार, नाट्यासह अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. 

रॉकी और रानी की प्रेम कहानी (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) : 
कधी प्रदर्शित होणार? 28 एप्रिल

करण जौहरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा 28 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. धर्मा प्रोडक्शनच्या या सिनेमात धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आजमी, रणवीर सिंह आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. 

यारियां 2 (Yaariyan 2) : 
कधी प्रदर्शित होणार? 12 मे

'यारियां 2' हा सिनेमा 12 मे 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या कौटुंबिक सिनेमात यश दासगुप्ता, दिव्या खोसला कुमार, मीजान जाफरी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 

स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) :
कधी प्रदर्शित होणार? 26 मे

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा सिनेमा 26 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अंकिता लोखंडेदेखील दिसणार आहे. 

जवान (Jawan) :
कधी प्रदर्शित होणार? 2 जून 

शाहरुख खानचा बहुचर्चित 'जवान' हा सिनेमा 2 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपथी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. एटली कुमारने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

आदिपुरुष (Adipurush) : 
कधी प्रदर्शित होणार? 16 जून

'आदिपुरुष' हा बहुचर्चित सिनेमा या वर्षातला सर्वात मोठा बिग बजेट सिनेमा आहे. 16 जूनला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. रामायणावर आधारित या सिनेमात सुपरस्टार प्रभास, सैफ अली खान, कृती सेनन आणि सनी सिंह मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. मराठमोळ्या ओम राऊतने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

ड्रीम गर्ल 2 (Dream Girl 2) : 
कधी प्रदर्शित होणार? 23 जून

'ड्रीम गर्ल 2' हा सिनेमा 23 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

सत्यप्रेम की कथा (Satyaprem Ki katha) : 
कधी प्रदर्शित होणार? 29 जून

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणीचा 'सत्यप्रेम की कथा' हा सिनेमा 29 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. समीर विद्वांसने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 

योद्धा (Yodha) :
कधी प्रदर्शित होणार? 7 जुलै

सिद्धार्थ मल्होत्राचा 'योद्धा' हा सिनेमा 7 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात सिद्धार्थसह दिशा पटाणी आणि राखी खन्ना मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे. 

रोला (Rola) : 
कधी प्रदर्शित होणार? 28 जुलै

आनंद तिवारी दिग्दर्शित 'रोला' हा सिनेमा 28 जुलैला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात विकी कौशलच्या अभिनयाची झलक पाहायला मिळणार आहे. 

अॅनिमल (Animal) : 
कधी प्रदर्शित होणार? 11 ऑगस्ट

रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना आणि परिणीती चोप्रा अशी तगडी स्टारकास्ट असलेला 'अॅनिमल' हा सिनेमा 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टी-सीरिज या सिनेमाची निर्मिती करणार आहे. 

तारिक (Tariq) : 
कधी प्रदर्शित होणार? 15 ऑगस्ट

अभिनेता जॉन अब्राहमचा 'तारिक' या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. अरुण गोपालन दिग्दर्शित हा सिनेमा 15 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

हॅपी टीचर्स डे (Happy Teachers Day) : 
कधी प्रदर्शित होणार? 5 सप्टेंबर

निमरत कौर मुख्य भूमिकेत असलेला 'हॅपी टीचर्स डे' हा सिनेमा 5 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टायगर 3 (Tiger 3) :
कधी प्रदर्शित होणार? 10 नोव्हेंबर 

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा आगामी 'टायगर 3' चा सिनेमा येत्या वर्षात 10 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साजिद खानने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात सलमान खानसह कतरिना कैफ स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. 

सॅम बहादुर (Sam Bahadur) : 
कधी प्रदर्शित होणार? 1 डिसेंबर

मेघना गुलजार दिग्दर्शित 'सॅम बहादुर' हा सनेमा 1 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात विकी कौशल, सान्या मल्होत्रा आणि फातिमा शेख मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 

बडे मिया छोटे मिया (Bade Miyan Chote Miyan) : 
कधी प्रदर्शित होणार? 22 डिसेंबर

अक्षय कुमारचा आगामी 'बडे मिया छोटे मिया' हा सिनेमा 22 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

डंकी (Dunki) 
कधी प्रदर्शित होणार? 22 डिसेंबर

राजकुमार हिरानीचा 'डंकी' हा सिनेमा 22 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात शाहरुख खान आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहेत. 

संबंधित बातम्या

OTT Release In December Last Week: वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात होणार मनोरंजनाचा धमाका; 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज येणार प्रेक्षकांच्या भेटीस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde All MLA | शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार एकच फ्रेममध्ये!Eknath Shinde MLA Welcome | निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचं शिंदेंकडून स्पेशल वेलकमDevendra Fadnavis CM? | संघाची फडणवीसांना पसंती असू शकते का? Special ReportMahayuti Ladki bahin Yojana | महायुतीसाठी लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Embed widget