TJMM Box Office Collection: ‘तू झूठी मैं मक्कार’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये करणार एन्ट्री?
‘प्यार का पंचनामा’ फेम दिग्दर्शक लव्ह रंजननं (Luv Ranjan) दिग्दर्शित केलेल्या ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या कलेक्शनबाबत...
TJMM Box Office Collection Day 8 : रोमँटिक आणि कॉमेडी कथानकावर अधारित असणारा 'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhoothi Mein Makkar) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांचा हटके अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यनने देखील या चित्रपटात कॅमिओ केला आहे. ‘प्यार का पंचनामा’ दिग्दर्शक फेम लव्ह रंजनने दिग्दर्शित केलेल्या ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या कलेक्शनबाबत...
‘तू झूठी मैं मक्कार’ने पहिल्या वीकेंडमध्ये 70 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. ओपनिंग-डेला या चित्रपटाने भारतात 15.73 कोटींची कमाई केली. आता आठव्या दिवशी म्हणजेच बुधवारी (15 मार्च) या चित्रपटाने 5.60 कोटींची कमाई केली आहे. आता या चित्रपटाची एकूण कमाई 87.91 कोटी एवढी झाली आहे. वीकेंडला हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असं म्हटलं जात आहे. जर ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये समील झाला तर हा चित्रपट 100 कोटी कमाई करणारा 2023 मधील पठाणनंतरचा दुसरा चित्रपट ठरेल. लव्ह रंजन लिखित आणि दिग्दर्शित 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटाची निर्मिती लव्ह फिल्म्स आणि टी-सीरिज फिल्म्स यांनी केली आहे.
'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटात रणबीर आणि श्रद्धा यांच्यासोबतच अनुभव सिंह बस्सी, डिंपल कपाडिया यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या माध्यामातून बोनी कपूर यांनी अभिनयात पदार्पण केलं.
या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट होणार रिलीज
लवकरच 'तू झूठी मैं मक्कार' हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे, असं म्हटलं जात आहे.
रणबीर आणि श्रद्धाचे आगामी चित्रपट
रणबीर आणि श्रद्धा हे 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटानंतर काही बिग बजेट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. रणबीरचा अॅनिमल हा आगामी चित्रपट लवकरच रिलीज होईल. चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. तसेच श्रद्धा ही स्त्री-2 या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: