(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tripti Dimri: 'अॅनिमल'मधील 'तो' इंटिमेट सीन पाहून तृप्तीचे आई-वडील म्हणाले तरी काय?
Tripti Dimri: एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तृप्तीनं अॅनिमल (Animal) चित्रपटातील इंटिमेट सीन पाहिल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी कशी रिअॅक्शन दिली? याबद्दल सांगितलं आहे.
Tripti Dimri: संदीप रेड्डी वंगा (Sandeep Reddy Vanga) दिग्दर्शित अॅनिमल (Animal) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटातील रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि तृप्ती डिमरी (Tripti Dimri) यांच्या इंटिमेट सीन्सची चर्चेचा सोशल मीडियावर होत आहे. चित्रपटातील रणबीर आणि तृप्ती यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. एका मुलाखतीमध्ये तृप्तीनं अॅनिमल चित्रपटातील इंटिमेट सीन शूट करताना आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं होतं. आता नुकत्याच एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तृप्तीनं अॅनिमल चित्रपटातील इंटिमेट सीन पाहिल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी कशी रिअॅक्शन दिली? याबद्दल सांगितलं आहे.
इंटिमेट सीन पाहिल्यानंतर काय म्हणाले तृप्तीचे आई-वडिल?
बॉलिवूड हंगामा या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये तृप्तीला अॅनिमल चित्रपटामधील इंटिमेट सीनबाबत विचारण्यात आलं. यावेळी तृप्तीनं चित्रपटामधील तिचा आणि रणबीरचा इंटिमेट सीन पाहिल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी कशी रिअॅक्शन दिली याबद्दल सांगितलं. ती म्हणाली, 'माझ्या पालकांना थोडे आश्चर्य वाटले. इंटिमेट सीन पाहिल्यानंतर ते म्हणाले, आम्ही चित्रपटांमध्ये असे काही पाहिले नव्हते आणि ते तू केले आहे. सीन पाहिल्यानंतर त्यांना नॉर्मल व्हायला थोडा वेळ लागला."
तृप्तीचे आई-वडिल म्हणाले, "तू हे नव्हतं करायला पाहिजे"
तृप्तीनं पुढे सांगितलं, "माझे पालक मला म्हणाले की, "तू हे नव्हतं करायला पाहिजे, पण ठीक आहे. पालक म्हणून त्यांना असे वाटणे साहजिक आहे. मी त्यांना सांगितले की मी काहीही चुकीचे करत नाही. हे माझे काम आहे आणि जोपर्यंत मी सुरक्षित आहे तोपर्यंत मला त्यात कोणतीही अडचण वाटत नाही. मी एक अभिनेत्री आहे आणि मी साकारलेल्या व्यक्तिरेखेशी प्रामाणिक असले पाहिजे आणि मी तेच केलं आहे."
View this post on Instagram
अॅनिमल चित्रपटामधील इंटिमेट सीनबाबत तृप्तीनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं," सेटवर फक्त चार-पाच लोक होते. दर पाच मिनिटांनी ते सर्व लोक मला विचारत होते, 'तू ठीक आहेस ना?' तुला काही हवे आहे का? तुला कम्फर्टेबल वाटत आहे का?' जेव्हा तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला खूप पाठिंबा देतात, तेव्हा तुम्हाला अजिबात विचित्र वाटत नाही."
संबंधित बातम्या: