Ranbir Kapoor And Tripti Dimri Intimate Scene: तृप्तीनं सांगितला 'अॅनिमल'मधील इंटिमेट सीन शूट करताना आलेला थरारक अनुभव; म्हणाली, "दर पाच मिनिटांनी..."
Animal Movie: तृप्तीनं (Tripti Dimri) एका मुलाखतीमध्ये अॅनिमल (Animal) चित्रपटामधील इंटिमेट सीन शूट करताना आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे.
Ranbir Kapoor And Tripti Dimri Intimate Scene: सध्या अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) ही तिच्या अॅनिमल (Animal) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामधील तृप्तीच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. या चित्रपटात तृप्ती आणि अभिनेता रणबीर कपूरचे (Ranbir Kapoor) काही इंटिमेट सीन्स देखील आहेत. या इंटिमेट सीन्सचे व्हिडीओ आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच तृप्तीनं एका मुलाखतीमध्ये अॅनिमल चित्रपटामधील इंटिमेट सीन शूट करताना आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे.
तृप्तीनं सांगितला अनुभव (Ranbir Kapoor And Tripti Dimri Intimate Scene)
अॅनिमल चित्रपटामधील इंटिमेट सीनबाबत तृप्ती म्हणाली," सेटवर फक्त चार लोक होते - मी, रणबीर, संदीप आणि डीओपी. दर पाच मिनिटांनी ते सर्व लोक मला विचारत होते, 'तू ठीक आहेस ना?' तुला काही हवे आहे का? तुला कम्फर्टेबल वाटत आहे का?' जेव्हा तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला खूप पाठिंबा देतात, तेव्हा तुम्हाला अजिबात विचित्र वाटत नाही."
रणबीर कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्या अॅनिमल चित्रपटामधील इंटिमेट सीनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या सीनमधील रणबीर आणि तृप्तीच्या केमिस्ट्रीचं अनेकजण कौतुक करत आहेत. या सीनमध्ये रणबीर आणि तृप्ती हे सेमी न्यूड दिसत आहेत.
1 डिसेंबर रोजी अॅनिमल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात रणबीर कपूरसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna), बॉबी देओल आणि अनिल कपूर यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. 'अॅनिमल' या चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांनी केलं आहे.
Ranbir kapoor and Tripti dimri's chemistry stole the entire spotlight! They were just magical together ❤️#TriptiDimri #Animal pic.twitter.com/sz9u0kwyNy
— Shizu 💃 (@Shizu_tweets) December 2, 2023
'अॅनिमल' नं बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ
'अॅनिमल' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाचे सात दिवसांचे एकूण कलेक्शन 338.85 कोटींवर पोहोचले आहे. या चित्रपटात अनिल कपूर रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेत, रश्मिका पत्नीच्या भूमिकेत आणि बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. 'अॅनिमल' या सिनेमाला सेन्सॉरने 'A' सर्टिफिकेट दिलं.
संबंधित बातम्या:
- Ranbir Kapoor And Tripti Dimri: "अॅनिमल" मधील तृप्ती डिमरीच्या बोल्डनेसची चर्चा; रणबीरसोबतचा बेडरुम सीन व्हायरल, नेटकरी म्हणाले....
- Animal Movie: रणबीरच्या "लीक माय शू" डायलॉगबाबत 'अॅनिमल' मधील तृप्ती डिमरीनं सोडलं मौन, म्हणाली, "मला असे सांगितले तर मी..."