एक्स्प्लोर
लालच और डर गद्दार बनाते है, 'सरकार 3'चा ट्रेलर रिलीज
मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, यामी गौतम, जॅकी श्रॉफ, मनोज वाजपेयी, सुप्रिया पाठक अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या 'सरकार 3' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. पहिल्या दोन भागांप्रमाणेच राम गोपाल वर्मा यांनीच सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
जबरदस्त संवाद ही सरकार 3 ची जमेची बाजू म्हणावी लागेल. विशेष म्हणजे काही वेळा अमिताभ बच्चन मराठीतही संवाद म्हणताना दिसतील. जेव्हा सिंह घायाळ होतो, तेव्हा तो आणखी भयावह होतो, ही या चित्रपटाची थीम आहे. पहिल्या दोन भागांपेक्षा हा स्वतंत्र असेल, अशी माहिती राम गोपाल वर्मांनी दिली.
अमिताभ बच्चन, रोहिणी हट्टंगडी, रामगोपाल वर्मा, यामी गौतम, अमित साध, जॅकी श्रॉफ यांच्या उपस्थितीत सरकार 3 चा ट्रेलर लाँच करण्यात आला. यामी गौतम चित्रपटात खलनायिका साकारत असल्याच्या चर्चांना रामूने पूर्णविराम दिला. 'सरकार 3' मधील प्रत्येक व्यक्तिरेखा ही ग्रे शेड आहे. हा सिनेमा 7 एप्रिलला रिलीज होणार आहे.
पाहा ट्रेलर :
http://erosnow.com/movie/watch/1058673/sarkar-3/6796335/exclusive-official-trailer?ap=1
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
बातम्या
राजकारण
Advertisement