Top Gun Maverick : टॉम क्रूझच्या 'Top Gun Maverick' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, अमेरिकेत विकेंडला केली 1129 कोटींची कमाई
Top Gun Maverick : टॉम क्रूझच्या 'टॉप गन मॅव्हरिक' या सिनेमाने अमेरिकेत विकेंडला 1129 कोटींची कमाई केली आहे.
Top Gun Maverick : टॉम क्रूझचा (Tom Cruise) 'टॉप गन मॅव्हरिक' (Top Gun Maverick) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या सिनेमाने अमेरिकेत विकेंडला 1129 कोटींची कमाई केली आहे.
'टॉप गन मॅव्हरिक'ने पहिल्याच विकेंडला केली होती 750 कोटींची कमाई
'टॉप गन मॅव्हरिक' या सिनेमाने पहिल्याच विकेंडला 750 कोटींची कमाई केली होती. भारतात हा सिनेमा चांगली कमाई करत नसला तरी जगभरात या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला आहे. कोरोनामुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. हा सिनेमा आधी 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता. पण निर्मात्यांनी या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे.
'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये 'टॉप गन मॅव्हरिक' या सिनेमाचा प्रीमिअर झाला. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये कोणत्याही सिनेमाचा प्रीमिअर केला जात नाही. पण यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये 'टॉप गन: मॅव्हरिक' सिनेमाचा प्रीमिअर झाला आहे. 27 मे रोजी अमेरिकेत या सिनेमाचा प्रीमिअर झाला आहे.
View this post on Instagram
'टॉप गन मॅव्हरिक'मध्ये टॉम क्रूझ प्रमुख भूमिकेत
'टॉप गन मॅव्हरिक' सिनेमात टॉम क्रूझ प्रमुख भूमिकेत आहे. तर जेनिफर कॉनेली, जॉन हॅम, ग्लेन पॉवेल, लुईस पुलमन, डॅनी रामिरेझ, मोनिका बार्बरो, एड हॅरिस आणि व्हॅल किल्मर हे कलाकार या सिनेमात दिसणार आहेत. या सिनेमाचा ट्रेलर 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
संबंधित बातम्या
Sarsenapati Hambirrao : 'सरसेनापती हंबीरराव'ची बॉक्स ऑफिसवर विक्रमी सुरुवात; तीन दिवसांत रचला इतिहास
Dharmaveer : सिनेमागृहात बायोपिकचा दबदबा; 'धर्मवीर'ने केली 22.58 कोटींची कमाई
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
and tablets