(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dharmaveer : सिनेमागृहात बायोपिकचा दबदबा; 'धर्मवीर'ने केली 22.58 कोटींची कमाई
Dharmaveer : 'धर्मवीर' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफसवर धुमाकूळ घालतो आहे. आतापर्यंत या सिनेमाने 22.58 कोटींची कमाई केली आहे.
Dharmaveer : महाराष्ट्रात सध्या 'धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे' (Dharmaveer mukkam post thane) या सिनेमाचाच बोलबाला आहे. 13 मे रोजी हा सिनेमा तब्बल चारशेहुन अधिक सिनेमागृहे आणि 10 हजारांहून अधिक शोजसह हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने हाऊसफुल्लचे बोर्ड अभिमानाने झळकवले आहेत. आतापर्यंत या सिनेमाने 22.58 कोटींची कमाई केली आहे.
रिलीजचा तिसरा विकेंडदेखील हाऊसफुल्ल
'धर्मवीर' हा सिनेमा सिनेमागृहात चांगलीच कमाई करत आहे. तिसऱ्या आठवड्याच्या विकेंडलादेखील सिनेमागृहाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड झळकले आहेत. मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद या भागांमध्ये प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
'धर्मवीर'ने आतापर्यंत केली 22.58 कोटींची कमाई
'धर्मवीर' सिनेमाने आतापर्यंत 22.58 कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे 'धर्मवीर'चा तिसरा सुपरहिट आठवडा सुरू झाला आहे. हिंदी सिनेमांना गर्दी करणारे प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे दुर्लक्ष करत असल्याचं बोललं जातं पण 'धर्मवीर' ने बॉक्सऑफिसवरच्या घवघवीत यशाने प्रेक्षक पुन्हा मराठी चित्रपटाकडे येऊ लागल्याचं सुखद चित्र दिसत आहे. अभिनेते प्रसाद ओक यांनी साकारलेल्या आनंद दिघे यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी आपल्या पसंतीची ठसठशीत मोहोर उमटवली आहे.
प्रविण तरडे यांच्या दमदार लेखन आणि कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने सजलेला, झी स्टुडिओज, मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असलेला ‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे.
पहिल्याच आठवड्यात केली 13.87 कोटींची कमाई
'धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे' या सिनेमासह हिंदीतील बिग बजेट सिनेमेदेखील बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले होते. परंतु धर्मवीर पुढे त्यांचा टिकाव लागला नाही. अगदी पहिल्याच दिवसापासून धर्मवीरची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरू आहे. 'धर्मवीर'ने पहिल्याच आठवड्यात 13.87 कोटींची कमाई केली आहे. केवळ ठाण्यानेच नाही तर अवघ्या महाराष्ट्राने 'धर्मवीरांचा जय महाराष्ट्र' प्रेमानं स्वीकारला आहे.
संबंधित बातम्या