TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.
TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
'आर आर आर' ते 'ब्रह्मास्त्र', बॉलिवूडचे 'हे' बिग बजेट चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज
काही चित्रपट हे कथानकापेक्षा स्टार कास्ट आणि बजेटमुळे चर्चेत असतात. जवळपास 100 कोटी बजेट असणारे चित्रपटांबद्दल तुम्ही ऐकले असेल पण काही आगामी चित्रपटांचे बजेट हे 300 कोटी आहे. यात अजय देवगण , आलिया भट्ट, ज्यूनियर एनटीआर आणि राम चरणच्या आरआरआर सिनेमाचा सहभाग आहे. अक्षय कुमार, मानुषी छिल्लर आणि सोनू सूदची मुख्य भूमिका असलेला पृथ्वीराज सिनेमादेखील आहे. ब्रह्मास्त्र हा चित्रपट 9 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
जॉन अब्राहमच्या 'तेहरान' सिनेमाचे पोस्टर लॉंच
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘तेहरान’ असे या चित्रपटाचे नाव आहे. ‘तेहरान’ हा एक अॅकशन थ्रिलर चित्रपट आहे. जॉन अब्राहम नेहमीच आपल्या अॅक्शन चित्रपटांसाठी चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा तो त्याचं अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पावनखिंडनंतर 'शेर शिवराज' येणार रुपेरी पडद्यावर
'पावनखिंड' सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. 18 फेब्रुवारीला सिनेमा प्रदर्शित झाला आहे. लवकरच दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकरांचा 'शेर शिवराज' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवराज अष्टक फिल्म सीरिज ही छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या जीवनावर आधारित असलेली आठ सिनेमांची सीरिज आहे. त्यातले फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड प्रदर्शित झाले आहेत.
शेंगदाणे विकता विकता रातोरात सेलिब्रिटी झाला कच्चा बदामचा गायक
सोशल मीडियावर सध्या 'कच्चा बदाम' गाण्याने धुमाकूळ घातला आहे. सर्वसामान्यांपासून बड्या सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण 'कच्चा बदाम'वर थिरकताना दिसत आहेत. या गाण्यावर भन्नाट रिल्स आणि व्हिडीओदेखील बनत आहेत. हे गाणे भुवन बडायकरने गायले आहे. भुवन हा एक शेंगदाणे विक्रेता आहे. पण 'कच्चा बदाम' या गाण्यामुळे तो रातोरात सेलिब्रिटी झाला आहे. त्याला अनेक ऑफर्स मिळू लागल्या आहेत.
'द फॅमिली मॅन 3' ची प्रतीक्षा संपली
मनोज बाजपेयी बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सिनेमांसोबत त्यांनी अनेक वेबसीरिजमध्येदेखील काम केले आहे. त्यांची 'द फॅमिली मॅन' ही वेब सीरिज प्रचंड गाजली होती. 'द फॅमिली मॅन' चे दोन सीझन यशस्वी झाल्यानंतर प्रेक्षक 'द फॅमिली मॅन 3' वेबसीरिजची प्रतीक्षा करत होते. आता या वेबसीरिज संदर्भात एक मोठी अपडेट आली आहे. या वर्षाच्या अखेरीस ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते.
संबंधित बातम्या
डिजिटल पद्धतीने शेतीसाठी आमिर खान आग्रही; सोयाबिन डिजिटल शेती शाळा कार्यक्रमात म्हणाला...
The Good Maharaja : 'द गुड महाराजा' लवकरच होणार प्रदर्शित, संजय दत्त दिसणार मुख्य भूमिकेत
Sher Shivraj : शिवरायांची कीर्ती पुन्हा दुमदुमणार! फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंडनंतर 'शेर शिवराज' येणार रुपेरी पडद्यावर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha