(Source: ECI/ABP News/ABP Majha)
The Good Maharaja : 'द गुड महाराजा' लवकरच होणार प्रदर्शित, संजय दत्त दिसणार मुख्य भूमिकेत
Sanjay Dutt : संजय दत्तचा आगामी 'द गुड महाराजा' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
The Good Maharaja : अनेक ऐतिहासिक सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही बिग बजेट ऐतिहासिक सिनेमे बनवले जात आहेत. असाच एक बिग बजेट ऐतिहासिक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'द गुड महाराजा' (The Good Maharaja) असे या सिनेमाचे नाव आहे. या सिनेमात संजय दत्त (Sanjay Dutt) मुख्य भूमिकेत आहे.
'द गुड महाराजा' सिनेमाची कथा काय आहे?
'द गुड महाराजा' सिनेमाचे बजेट 400 कोटी आहे. दुसऱ्या महायुद्धात तत्कालीन सोव्हिएत रशियापासून सुटका केलेल्या 1000 पोलिश मुलांना जामनगरचे महाराजा दिग्विजय सिंग आणि रणजित सिंग जडेजा यांनी बालाचडी येथे मदत केली. त्यांना गुजरातमध्ये आश्रय दिला. ती मुलेही महाराजसाहेबांना प्रेमाने 'बापू' म्हणत. या कथेवर आधारीत हा सिनेमा आहे. विकास वर्मा 'द गुड महाराजा' सिनेमाचे निर्माते आहेत.
View this post on Instagram
'द गुड महाराजा' या सिनेमात संजय दत्त नवानगरच्या (आताचे जामनगर, गुजरात) महाराजा जाम साहिबच्या मुख्य भूमिकेत आहे. तर ध्रुव वर्मा रशियन स्नायपरच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर गुलशन ग्रोव्हर, दीपराज राणा, शरद कपूर आणि नाझिया हुसेन यांसारखे दिग्गज कलाकारदेखील आहेत. तसेच पोलंडमधील अॅना अॅडोर, कॅट ख्रिश्चन, अॅना गुझिक, नतालिया बाख, पावेल चेक, सिल्व्हिया चेक, जेर्झी हॅन्डझलिक आणि जेसेक सारख्या कलाकारांच्यादेखील सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
संबंधित बातम्या
Sher Shivraj : शिवरायांची कीर्ती पुन्हा दुमदुमणार! फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंडनंतर 'शेर शिवराज' येणार रुपेरी पडद्यावर
New Web Series : क्राईम थ्रिलर वेब सीरिज पाहायला आवडतात? पुढच्या महिन्या रिलीज होणार 'या' सीरिज
Tehran : जॉन अब्राहमच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर लाँच, ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘तेहरान’
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha