एक्स्प्लोर

डिजिटल पद्धतीने शेतीसाठी आमिर खान आग्रही; सोयाबिन डिजिटल शेती शाळा कार्यक्रमात म्हणाला...

Aamir Khan News Soybean Digital Farming : अभिनेता आमिर खाननं म्हटलं की, ,शेती जाणून घेण्यासाठी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

Aamir Khan News Soybean Digital Farming School : राज्यात सोयाबिनचे क्षेत्र 41 लाख हेक्टर असून सध्या शेतीक्षेत्रात सोयाबीन प्रथम क्रमांकाचे पीक आहे.  यासाठी सोयाबिन डिजिटल शेती शाळा हे पुस्तक शेतकऱ्यांसाठी सरकारनं आणलं आहे. पाणी फाऊंडेशन, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने यासंदर्भात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात अभिनेता आमिर खाननं म्हटलं की, ,शेती जाणून घेण्यासाठी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या माध्यमातून खूप काही शिकण्याची संधी मिळाली. डिजिटल पद्धतीने ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, असं तो म्हणाला. 

आमिर खान म्हणाला की, सोयाबीन शेतीच्या प्रत्येक बाबतीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञांची टीम स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये डॉ.मिलिंद देशमुख, डॉ.अनित दुर्गुडे, डॉ.नाद्रा भुते आणि सचिन महाजन. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील डॉ. जाधव आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील आर.एस.डॉ. राजीव पावरेड आहेत. राहुरी विद्यापीठाच्या प्रसारण केंद्राचीही मदत झाल्याचे  आमिर खान यांनी सांगितले.

'सोयाबिन डिजिटल शेती शाळा'ला मोठा प्रतिसाद 

पाणी फांऊडेशनचे कार्यकारी संचालक सत्यजित भटकळ म्हणाले, राज्यात 21 मे ते 3 ऑक्टोबर 2021 दरम्यान या शेतीशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना ऑनलाइन फॉर्म भरणे आवश्यक होते.  'सोयाबिन डिजिटल शेती शाळा' हे पुस्तक ऑनलाइन स्वरुपातही उपलब्ध असणार आहे. याचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना  होणार आहे. या फार्म शाळेसाठी 46 हजार 327 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. 197 वॉट्सअप ग्रुपमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग होता. 13 लाईव्ह प्रश्नोत्तराची सत्र आयोजित करण्यात आली. यामध्ये 5 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी सहभागी घेऊन सोयाबिन उत्पन्न वाढीसाठी विविध प्रश्न विचारले. महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यातील मराठी भाषिक समुदायांनीही या फार्म स्कूलसाठी नोंदणी केली आहे. पुर्व मशागत ते कापणी असे सोयाबिनविषयक 23 ट्रेनिंग व्हिडीओ तयार करुन 197 वॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ते शेतकऱ्यापर्यंत पोहचविण्यात आले. त्यामध्ये शेती उत्पन्नाच्या सुधारित पद्धतीविषयी, जसे बियाणे निवड, उगवण क्षमता, तपासणी, बीजप्रक्रिया, बीबीएफवर पेरणी, तण नियंत्रण हात कोळपे, एकात्मिक खत व्यवस्थापन, ग्रेडींग, पॅकींग, मार्केटींग आदी विषयी माहिती पाणी फांऊडेशनचे कार्यकारी संचालक सत्यजित भटकळ यांनी यावेळी दिली.

राज्यात शेतीक्षेत्रात सोयाबीन प्रथम क्रमांकाचे पीक

कृषी मंत्री दादा भुसे यावेळी म्हणाले की, राज्यात सोयाबिनचे क्षेत्र 41 लाख हेक्टर असून सध्या शेतीक्षेत्रात सोयाबीन प्रथम क्रमांकाचे पीक आहे. त्याची उत्पादकता वाढविण्यासाठी सोयाबिन डिजीटल शेती शाळा हे पुस्तक ज्या भागात सोयाबिन क्षेत्र आहे. त्या शेतकऱ्यापर्यंत पोहचवू. या  पुस्तकात शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यात आली असून त्याचा लाभ शेतकऱ्यांना निश्चित होईल, असं भुसे म्हणाले.  पाणी फांऊडेशन ही संस्था अनेक क्षेत्रात महत्वाची भूमिका पार पाडत आहे. कोविडच्या काळात शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत प्रत्यक्ष जावू शकत नसल्याने शेती क्षेत्रात नवीन प्रयोग म्हणून 'सोयाबिन डिजिटल शेती शाळा' या माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. भुसे म्हणाले, या पुस्तकाच्या माध्यमातून शेतकऱ्याला लाभ होवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. तसेच सोयाबिन उत्पन्न वाढीस चालना मिळेल. शेतकऱ्याची उत्पादकता व निर्यातक्षम माल कसा वाढविता येईल यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यापुढे क्षेत्र आधारित रिर्सोस बँक तसेच कृषि विद्यापिठे व पाणी फाऊंडेशन यांच्याकडून नवीन तज्ज्ञ व्यक्तींची निवड करुन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष ज्ञान कसे देता येईल, यावर भर राहणार आहे. शेतकरी बांधवाची प्रगती झाली पाहिजे हा शासनाचा मानस असून यासंदर्भात पूर्ण सहकार्य करण्यात येईल असेही,भुसे यांनी सांगितले.

पोपटराव पवार म्हणाले, मशागतीपासून कापणीपर्यंतचे तंत्रज्ञान अवगत करुन कापणीपासून ते बाजारपेठेपर्यंत कसे नेता येईल, यासाठी कार्यशाळेचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. या प्लॅटफार्मच्या माध्यमातून विविध योजनांचे व्हिडीओ तयार करुन  शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या भाषेत संबंधित विषय त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे. शेतीसंदर्भात महाराष्ट्र शासन आणि पाणी फाऊंडेशनने मिळून काम केल्यास महाराष्ट्र देशात अग्रेसर असेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Thane Lok Sabha Election : ठाण्याचा गड कोण लढणार? शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच, फडणवीसांच्या आग्रहापुढे शिंदे हात टेकणार?
ठाण्याचा गड कोण लढणार? शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच, फडणवीसांच्या आग्रहापुढे शिंदे हात टेकणार?
प्रथमच अंबानी-अदानी एकत्र! अंबानींनी केली अदानींच्या कंपनीत गुंतवणूक; नेमका काय आहे करार?
प्रथमच अंबानी-अदानी एकत्र! अंबानींनी केली अदानींच्या कंपनीत गुंतवणूक; नेमका काय आहे करार?
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
Horoscope Today 29 March 2024 :  धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल, जाणून घ्या मेष ते मीन राशींचे शुक्रवारचे राशीभविष्य
धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल, जाणून घ्या मेष ते मीन राशींचे शुक्रवारचे राशीभविष्य
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 29 मार्च 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 07 AM :  29 March 2024 : Maharashtra NewsUddhav Thackeray Group On Shinde  Group : गोविंदाला पक्षात घेताना भाजपला नक्की विचारलंय ना?Jayant Patil On Govinda : गोविंदाचे चित्रपट चालत नाही,जयंत पाटलांचा टोला : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Lok Sabha Election : ठाण्याचा गड कोण लढणार? शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच, फडणवीसांच्या आग्रहापुढे शिंदे हात टेकणार?
ठाण्याचा गड कोण लढणार? शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच, फडणवीसांच्या आग्रहापुढे शिंदे हात टेकणार?
प्रथमच अंबानी-अदानी एकत्र! अंबानींनी केली अदानींच्या कंपनीत गुंतवणूक; नेमका काय आहे करार?
प्रथमच अंबानी-अदानी एकत्र! अंबानींनी केली अदानींच्या कंपनीत गुंतवणूक; नेमका काय आहे करार?
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
Horoscope Today 29 March 2024 :  धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल, जाणून घ्या मेष ते मीन राशींचे शुक्रवारचे राशीभविष्य
धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल, जाणून घ्या मेष ते मीन राशींचे शुक्रवारचे राशीभविष्य
Health News : भारतीय तरुणांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढतंय? चिंताजनक अहवाल समोर, 'या' गोष्टी जबाबदार, डॉक्टर सांगतात...
Health News : भारतीय तरुणांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढतंय? चिंताजनक अहवाल समोर, 'या' गोष्टी जबाबदार, डॉक्टर सांगतात...
Rishabh Pant : चांगली सुरुवात करुनही अपयश,रिषभ पंत प्रचंड संतापला, आऊट होताच जे केलं ते धक्कादायक
रिषभ पंत चहलच्या बॉलिंगवर आऊट होताच प्रचंड संतापला, रागात बॅट भिंतीवर आपटली, पाहा व्हिडीओ
Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score:  20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
Embed widget