Telly Masala : मुनव्वर फारुकी 'बिग बॉस 17'चा विजेता ते 'फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024'चे विजेते; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Filmfare Awards 2024 Winner : '12 वी फेल' सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान पटकावला 'या' अभिनेत्याने; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
Filmfare Awards 2024 Winner List : 'फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024' (Filmfare Awards 2024) हा हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला आहे. यंदा गुजरातमध्ये या सोहळ्याचं नियोजन करण्यात आलं होतं. 'फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024'मध्ये आलिया भट्ट (Alia Bhatt) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळणार आहे. तर '12 वी फेल' (12th Fail) सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Bigg Boss 17 Winner : मुनव्वर फारुकी ठरला 'बिग बॉस-17' चा विजेता; ट्रॉफीसह मिळाले लाखो रुपये
Bigg Boss 17: छोट्या पडद्यावरील बिग बॉस-17 (Bigg Boss 17) या कार्यक्रमाचा मुनव्वर फारुकी Munawar Faruqui) हा विजेता ठरला आहे. मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui), अभिषेक कुमार (Abhishek Kumar) आणि मन्नार चोप्रा (mannara chopra) हे बिग बॉस-17 या कार्यक्रमाचे टॉप-3 स्पर्धक ठरले. यापैकी मुनव्वर फारुकीनं बिग बॉस-17 या कार्यक्रमाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. सलमान खाननं (Salman Khan) मुनव्वर फारुकीला बिग बॉस-17 या कार्यक्रमाची ट्रॉफी दिली. मुनव्वरला 50 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. तसेच त्याला एक कार देखील मिळाली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'ची प्रतीक्षा अवघ्या दोनशे दिवसांवर; 'सिंगम 3' सुद्धा तेव्हाच टक्कर देणार
Pushpa 2 : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा 2' (Pushpa 2) या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 'पुष्पा 2' हा 2024 च्या बहुचर्चित सिनेमांपैकी एक आहे. आता या सिनेमाच्या रिलीजला फक्त 200 दिवस बाकी आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
VIDEO: प्रियांकाच्या नवऱ्यावर प्रेक्षकांचं भलतंच प्रेम! प्रेक्षक 'जीजू-जीजू' ओरडायला लागल्यानंतर निकनं अशी दिली रिअॅक्शन
Nick Jonas: अभिनेत्री प्रियांका चोप्राचा (Priyanka Chopra) पती आणि गायक निक जोनास (Nick Jonas) हा सध्या त्याच्या भावासोबत मुंबईत आला आहे. निक जोनासनं काल (शनिवार) Lollapalooza मुंबई (Mumbai) कॉन्सर्टमध्ये परफॉर्म केले. भारतीय चाहत्यांनी निक आणि त्याच्या भावांचे जोरदार स्वागत केले. या कॉन्सर्टमध्ये अनेकजण निकला 'जीजू-जीजू' म्हणताना दिसले. नुकताच कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये प्रेक्षक निक जोनासला स्टेजवर पाहिल्यानंतर 'जीजू-जीजू' ओरडताना दिसत आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Bigg Boss Kannada 10 : 'बिग बॉस कन्नड-10'च्या ट्रॉफीवर कार्तिक महेशनं कोरलं नाव; इलेक्ट्रिक स्कूटर, कार अन् मिळाले 'इतके'लाख
Bigg Boss Kannada 10: अभिनेता किच्चा सुदीपनं (Kichcha Sudeep) होस्ट केलेला 'बिग बॉस कन्नड 10' (Bigg Boss Kannada 10) या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले 28 जानेवारी रोजी पार पडला. 'बिग बॉस कन्नड 10' या कार्यक्रमाचा अभिनेता कार्तिक महेश (Karthik Mahesh) हा विजेता ठरला आहे. कार्तिकला 50 लाख रुपये बक्षीस, एक कार आणि एक इलेक्ट्रिक स्कूटर देखील देण्यात आली. 'बिग बॉस कन्नड 10' या कार्यक्रमाचा ड्रोन प्रताप (Drone Prathap) हा उपविजेता ठरला आणि त्याने 10 लाख रुपयांचे रोख बक्षीस आणि इलेक्ट्रिक स्कूटर जिंकली.