Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'ची प्रतीक्षा अवघ्या दोनशे दिवसांवर; 'सिंगम 3' सुद्धा तेव्हाच टक्कर देणार
Pushpa 2 : अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा 2' हा 2024 च्या बहुचर्चित सिनेमांपैकी एक आहे. आता या सिनेमाच्या रिलीजला फक्त 200 दिवस बाकी आहेत.
Pushpa 2 : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा 2' (Pushpa 2) या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 'पुष्पा 2' हा 2024 च्या बहुचर्चित सिनेमांपैकी एक आहे. आता या सिनेमाच्या रिलीजला फक्त 200 दिवस बाकी आहेत.
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2: द रूल' हा 2024 च्या बहुप्रतीक्षित सिनेमांपैकी एक आहे. 15 ऑगस्ट 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता या सिनेमाच्या रिलीजला फक्त 200 दिवस बाकी आहेत. निर्मात्यांनी यासंदर्भात खास पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
'पुष्पा 2'चं काऊंटडाउन सुरू
'पुष्पा 2 : द रुल' या सिनेमाची निर्मिती माय थ्री या प्रोडक्शन हाऊसने केली आहे. या निर्मितीसंस्थेने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केलं आहे. या पोस्टमध्ये सिनेमाच्या रिलीजला फक्त 200 दिवस बाकी आहेत, असं लिहिलेलं आहे. 'पुष्पा: द राईज'नंतर आता 'पुष्पा 2 : द रुल' हा सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. पोस्टर शेअर करत निर्मात्यांनी लिहिलं आहे,"पुष्पा राजला रूल करायला आता फक्त 200 दिवस बाकी आहेत. 15 ऑगस्ट 2024 रोजी हा सिनेमा जगभरात प्रदर्शित होईल.
View this post on Instagram
तगडी स्टारकास्ट असणारा 'पुष्पा 2'
'पुष्पा 2' या सिनेमाची तगडी स्टारकास्ट आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. अल्लू अर्जुनसह रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) या सिनेमात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. अभिनेता फहद फासिलदेखील या सिनेमाचा भाग असणार आहे. सुकुमारने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
अल्लू अर्जुनच्या सिनेमाची चाहत्यांमध्ये क्रेझ
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' या सिनेमाच्या रिलीजची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. अभिनेत्याच्या वाढदिवशी या सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. 'पुष्पा' (Pushpa) हा सिनेमा 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
रोहित शेट्टीचा 'सिंघम 3' देणार टक्कर
बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'सिंघम 3' या सिनेमाचीदेखील प्रेक्षकांना आतुरता आहे. 'सिंघम 3' हा सिनेमादेखील 15 ऑगस्ट 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर सिंघम 3 आणि पुष्पा 2 हे सिनेमे आमने-सामने येणार आहेत. 'सिंघम 3'मध्ये अजय देवगन, अक्षय कुमार, रणवीर सिंह, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण, करीना कपूर आणि विकी कौशल महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
संबंधित बातम्या