Bigg Boss Kannada 10: 'बिग बॉस कन्नड-10'च्या ट्रॉफीवर कार्तिक महेशनं कोरलं नाव; इलेक्ट्रिक स्कूटर, कार अन् मिळाले 'इतके'लाख
Bigg Boss Kannada 10: 'बिग बॉस कन्नड 10' या कार्यक्रमाचा अभिनेता कार्तिक महेश (Karthik Mahesh) हा विजेता ठरला आहे. कार्तिकला 50 लाख रुपये बक्षीस, एक कार आणि एक इलेक्ट्रिक स्कूटर देखील देण्यात आली.

Bigg Boss Kannada 10: अभिनेता किच्चा सुदीपनं (Kichcha Sudeep) होस्ट केलेला 'बिग बॉस कन्नड 10' (Bigg Boss Kannada 10) या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले 28 जानेवारी रोजी पार पडला. 'बिग बॉस कन्नड 10' या कार्यक्रमाचा अभिनेता कार्तिक महेश (Karthik Mahesh) हा विजेता ठरला आहे. कार्तिकला 50 लाख रुपये बक्षीस, एक कार आणि एक इलेक्ट्रिक स्कूटर देखील देण्यात आली. 'बिग बॉस कन्नड 10' या कार्यक्रमाचा ड्रोन प्रताप (Drone Prathap) हा उपविजेता ठरला आणि त्याने 10 लाख रुपयांचे रोख बक्षीस आणि इलेक्ट्रिक स्कूटर जिंकली.
'हे' होते टॉप-3 स्पर्धक
28 जानेवारीला 'बिग बॉस कन्नड 10' चा ग्रँड फिनाले झाला. या फिनालेमध्ये संगीता शृंगेरी, कार्तिक महेश आणि ड्रोन प्रताप हे टॉप-3 स्पर्धक ठरले. यापैकी कार्तिक महेशनं 'बिग बॉस कन्नड 10' या कार्यक्रमाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. कार्तिकला तब्बल 2.98 कोटी मते मिळाल्याचेही किच्चा सुदीपनं सांगितलं.
किच्चा सुदीपने कार्तिकचं केलं कौतुक
कन्नड चित्रपटाचा सुपरस्टार किच्चा सुदीपने बिग बॉसच्या घरातील कार्तिकच्या गेम प्लॅनचे आणि सीझनमध्ये तो ज्या पद्धतीने खेळ केला त्याचे कौतुक केले.
View this post on Instagram
जाणून घ्या कार्तिक महेशबद्दल
कार्तिक महेशला राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'डोलू' या चित्रपटातील भूमिकेमुळे विशेष ओळख मिळाली. कार्तिकनं अनेक मालिकांमध्येही काम केले. याशिवाय कार्तिकने बिग बॉसच्या घरातील प्रत्येक आव्हानाचा धैर्याने सामना केला. बिग बॉसच्या घरातील त्याचा खेळ आणि मैत्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्तिक बिग बॉसच्या संपूर्ण सीझनमध्ये दोनदा हाऊस कॅप्टन बनला.
View this post on Instagram
एकीकडे मुनावर फारुकी 'बिग बॉस 17' या कार्यक्रमाचा विजेता ठरला, तर दुसरीकडे 'बिग बॉस कन्नड 10' या कार्यक्रमाचा कार्तिक महेश विजेता ठरला, सोशल मीडियाच्या माध्यमातून मुनव्वर फारुकी आणि कार्तिक महेश यांच्यावर नेटकरी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


















