Filmfare Awards 2024 Winner : '12 वी फेल' सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान पटकावला 'या' अभिनेत्याने; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
Filmfare Awards 2024 : 'फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024'मध्ये आलिया भट्ट (Alia Bhatt) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळणार आहे. तर '12 वी फेल' (12th Fail) सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.
Filmfare Awards 2024 Winner List : 'फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024' (Filmfare Awards 2024) हा हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला आहे. यंदा गुजरातमध्ये या सोहळ्याचं नियोजन करण्यात आलं होतं. 'फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024'मध्ये आलिया भट्ट (Alia Bhatt) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळणार आहे. तर '12 वी फेल' (12th Fail) सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.
'फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024'मधील सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते त्यांच्या लाडक्या सेलिब्रिटींचं अभिनंदनही करत आहेत. 'फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024'ने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
View this post on Instagram
69 वा फिल्मफेयर पुरस्कार सोहळा गुजरातमधील गांधीनगरमध्ये पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. 'फिल्मफेयर अवॉर्ड्स 2024' करण जोहर (Karan Johar), आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आणि मनीष पॉल (Manish Paul) यांनी होस्ट केला. 27-28 जानेवारी 2024 दरम्यान हा पुरस्कार सोहळा पार पडला.
'फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024' विजेत्यांची यादी (Filmfare Awards 2024 Winner List)
सर्वोत्कृष्ट चित्रपट - 12 वीं फेल
सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स) - जोरम
सर्वोत्कृष्ट अभिनेता - रणबीर कपूर (अॅनिमल)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - आलिया भट्ट (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स) - विक्रांत मेस्सी (12 वी फेल)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स) - रानी मुखर्जी (मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे) आणि शेफाली शाह (थ्री ऑफ अस)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - विधु विनोद चोपडा (12 वी फेल)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - विकी कौशल (डंकी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - शबाना आझमी (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
सर्वोत्कृष्ट संवाद - इशिता मोइत्रा (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
सर्वोत्कृष्ट पटकथा - विधु विनोद चोप्रा (12 वी फेल)
सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री) - अलीजेह अग्निहोत्री (फर्रे)
सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेता) - आदित्य रावल (फराज)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण) - तरुण डुडेजा (धक धक)
जीवनगौरव पुरस्कार - डेविड धवन
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - भूपिंदर बब्बल (अर्जन वैली)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - शिल्पा राव (बेशरम रंग)
सर्वोत्कृष्ट वीएफएक्स - जवान
सर्वोत्कृष्ट कथा - अमित राय (ओएमजी 2) आणि देवाशीष मखीजा (जोरम)
सर्वोत्कृष्ट अॅक्शनपट - जवान
संबंधित बातम्या