एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Telly Masala : 'पंचायत 3'चा रिव्ह्यू ते जून महिन्यात ओटीटीवर चित्रपट अन् वेबसीरिजचा वर्षाव; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

June OTT Release : जून महिन्यात ओटीटीवर चित्रपट अन् वेब सीरिजचा वर्षाव; तुम्ही काय पाहणार?

June OTT Release : मे (May) महिन्यात अनेक धमाकेदार चित्रपट (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले. मे महिन्यात 'IPL 2024' आणि लोकसभा निवडणुकीची धामधूम होती. पण तरीही ओटीटीवरील कलाकृती पाहायला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. 'आयपीएल 2024' नंतरही प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. जून महिन्यात प्राईम व्हिडीओ, हॉटस्टार, झी 5 अशा वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि वेब सीरिजची बरसात होणार आहे. प्रत्येक आठवड्यात प्रेक्षकांना काहीतरी नवं पाहता येणार आहे. जाणून घ्या जून महिन्यात रिलीज होणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरिजबद्दल...

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Panchayat 3 Review : फुलेरा गाववाले घेऊन आलेत मनोरंजनाचा ट्रिपल डोस; वाचा 'पंचायत 3'चा रिव्ह्यू

Panchayat 3 Review : आजच्या घडीला वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या कलाकृती प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहेत. AI, व्हिजुअल इफेक्ट्स आले आहेत. थिएटर, लॅपटॉप आणि मोबाईलच्या स्क्रीनवर प्रेक्षक विचार करणार नाहीत अशा गोष्टी दाखवल्या जात आहेत. अशावेळी 'पंचायत' (Panchayat) सारखी वेबसीरिज येणं आणि ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणं हैराण करणारं आहे. प्राईम व्हिडीओवर बहुप्रतीक्षित 'पंचायत 3' ही सीरिज प्रेक्षकांना पाहता येईल. 35-40 मिनिटांचे आठ एपिसोड पुन्हा एकदा प्रेक्षकांना फुलेरा गावात घेऊन जातील. आपल्याला ज्या गोष्टींचं अप्रूप वाटतं त्या गोष्टींचं गावऱ्यांना अप्रूप आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Superstar Actor : आजवर एकाही सिनेमानं पार केला नाही 100 कोटींचा टप्पा; पण भाईजान, किंग खानही पडतात फिके, 'हा' सिनेइंडस्ट्रीचा 'सुपरस्टार'

Superstar Mammootty :  एखादा कलाकार किती यशस्वी आहे, हे त्याच्या हिट चित्रपटांवरून ठरवले जाते. त्यातही सध्या एखाद्या अभिनेत्याच्या नावावर 100 कोटींची कमाई करणारे किती चित्रपट आहेत, यावरून त्या अभिनेत्याच्या सुपरस्टारपदाचे मोजमाप केले जाते. बॉलिवूडपासून दक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांच्या चित्रपटांनी फक्त 100 कोटीच नव्हे तर 200, 300, 500 आणि 1000 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या यादीत अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), सलमान खान (Salman Khan), रणबीर कपूर (Ranbir Kapoor), रजनीकांत (Rajinikanth) प्रभासपासून ते अल्लू अर्जुनपर्यंत अनेक स्टार्सचा समावेश आहे. पण एका अभिनेत्याने 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले पण त्याच्या एकाही चित्रपटाने 100 कोटींचा गल्ला जमवला नाही. तरीही हा अभिनेता सुपरस्टार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Shashi Kapoor Shabana Azmi : शशी कपूरसोबत इंटिमेट सीन करताना 'अशी' झालेली शबाना आझमींची अवस्था; म्हणाल्या,"घाम फुटला, डोळ्यात पाणी"

Shashi Kapoor Shabana Azmi : शबाना आझमी (Shabana Azmi) सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. दर्जेदार अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. वयाच्या 72 व्या वर्षी शबानाने 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani ki Prem Kahani) या चित्रपटात धर्मेंद्रसोबत (Dharmendra) किसिंग सीन दिला होता. पण करिअरच्या सुरुवातीला इंटिमेट सीन करताना शबाना आझमी यांना घाम फुटला होता. 'हीरा और पत्थर' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शशी कपूर यांच्यासोबत इंटिमेट सीन करताना जावेद अख्तर (Javed Akhtar) यांची पत्नी शबाना आझमी (Shabana Azmi) यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे

Anant Ambani Radhika Merchant Wedding Bugdet : देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. अनंत-राधिकाचा 10-12 जुलै दरम्यान मुंबईत शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. त्याआधी 29 मे ते 1 जूनपर्यंत त्यांचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा पार पडणार आहे. इटली ते फ्रान्स दरम्यान क्रूझवर त्यांचं प्री-वेडिंग पार पडणार आहे. या प्री-वेडिंगला बॉलिवूडसह आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. अंबानींच्या या शाही लग्नसोहळ्याच्या बजेटमध्ये पाच बड्या सेलिब्रिटींचा लग्नसोहळा पार पडला होता.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaNCP Ajit Pawar : गुलाबी जॅकेट ते गुलाबी गाडी ; अजित पवारांची थीम यशस्वीMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Embed widget