एक्स्प्लोर

Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे

Anant Ambani Radhika Merchant Wedding Bugdet : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंगची जोरदार तयारी सुरू आहे. पण अंबानींच्या या लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचा शाही विवाहसोहळा पार पडला होता.

Anant Ambani Radhika Merchant Wedding Bugdet : देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. अनंत-राधिकाचा 10-12 जुलै दरम्यान मुंबईत शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. त्याआधी 29 मे ते 1 जूनपर्यंत त्यांचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा पार पडणार आहे. इटली ते फ्रान्स दरम्यान क्रूझवर त्यांचं प्री-वेडिंग पार पडणार आहे. या प्री-वेडिंगला बॉलिवूडसह आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. अंबानींच्या या शाही लग्नसोहळ्याच्या बजेटमध्ये पाच बड्या सेलिब्रिटींचा लग्नसोहळा पार पडला होता.

अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याला बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग सारखे आंतरराष्ट्रीय पातळीवरील दिग्गज मंडळी सहभागी झाले होते. सियासत डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, अनंत-राधिकाच्या लग्नात 1000 कोटी रुपये खर्च करणार आहेत. याआधी ईशाच्या लग्नात 400 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. ईशाने आपल्या लग्नात 90 कोटी रुपयांचा लेहेंगा परिधान केला होता. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अनुष्का शर्मा यांचं लग्नाचं एकूण बजेट 90-95 कोटी रुपयांच्या आसपास होतं. 

बॉलिवूडचा सर्वात महागडा लग्नसोहळा कोणता? 

प्रियंका चोप्रा-निक जोनस : प्रियंका चोप्रा आणि निक जोनस 2018 मध्ये लग्नबंधनात अडकले. 105 कोटी रुपयांत त्यांचा लग्नसोहळा पार पडला होता. उम्मेद भवन पॅलेसमध्ये त्यांनी लग्न केलं. लग्नाला येणाऱ्या VIP पाहुण्यासाठी आदल्या दिवशी राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रियाकांने आपल्या लग्नात 15 कोटी रुपयांचा वेडिंग ड्रेस परिधान केला होता. 

दीपिका पादुकोण-रणवीर सिंह : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह 2018 मध्ये लग्नबंधनात अडकले. 95 कोटी रुपये त्यांनी लग्नावर खर्च केले होते. विला डेल बालबियानोमध्ये समुद्रकिनारी त्यांचं लग्न झालं होतं. दीपिकाने सब्यसाची मुखर्जींनी डिझाइन केलेला 19 लाख रुपयांचा लेहेंगा परिधान केला होता. 

अनुष्का शर्मा-विराट कोहली : अनुष्का शर्मा आणि विराट कोहली 2017 मध्ये लग्नबंधनात अडकले. 90 कोटी रुपयांत बोरगो फिनोसिएतो रिसॉर्टमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला. अनुष्काने लग्नात तब्बल 32 लाख रुपयांचा लेहेंगा परिधान केला होता. 

शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी 2009 मध्ये लग्न केलं. 80 कोटी रुपये त्यांच्या लग्नाचं बजेट होतं. खंडाळ्यातील बावाज विलामध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला. शिल्पाने लग्नात 50 लाख रुपयांची साडी नेसली होती. 

ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन : ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन 2007 मध्ये लग्नबंधनात अडकले. त्यांच्या मुंबईत प्रतीक्षा बंगल्यातच हा लग्नसोहळा पार पडला. 40 कोटी रुपयांचं त्यांच्या लग्नाचं बजेट होतं. ऐश्वर्याने लग्नात 75 लाख रुपयांची साडी नेसली होती.

संबंधित बातम्या

Panchayat 3 Review : फुलेरा गाववाले घेऊन आलेत मनोरंजनाचा ट्रिपल डोस; वाचा 'पंचायत 3'चा रिव्ह्यू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Embed widget