![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Telly Masala : राज ठाकरेंच्या आयुष्यावरील चित्रपटाची पहिली झलक ते बिग बॉसच्या घरात अभिजीत बिचुकले वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणार? जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
Telly Masala : सध्या मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
![Telly Masala : राज ठाकरेंच्या आयुष्यावरील चित्रपटाची पहिली झलक ते बिग बॉसच्या घरात अभिजीत बिचुकले वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणार? जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या telly masala marathi movie Bollywood Movie marathi hindi serial OTT release update bigg boss marathi season 5 suraj chavan bhaucha Dhakka marathi news Telly Masala : राज ठाकरेंच्या आयुष्यावरील चित्रपटाची पहिली झलक ते बिग बॉसच्या घरात अभिजीत बिचुकले वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणार? जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/18/a91f40e285c2ee3c507011d93348b3371723974583890322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Raj Thackeray Biopic : आला रे आला... टीझर आला... मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आयुष्यावरील बायोपिकची पहिली झलक
Raj Thackeray Biopic : महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळी छाप पाडणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बायोपिकची पहिली झलक समोर आली आहे. राज ठाकरे यांचा जीवनपट असलेल्या चित्रपटाचं नाव 'येक नंबर' असं आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी या चित्रपटाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री तेजस्विनी पंडित, झी स्टुडिओज् आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटने केली आहे. राजेश मापुस्कर दिग्दर्शित हा चित्रपट 10 ॲाक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..
Son of Sardaar 2 : अजय देवगणला 'नमस्कार' न करणं विजय राजला पडलं महागात? 'सन ऑफ सरदार 2' चित्रपटातून बाहेरचा रस्ता
Ajay Devgn Son of Sardaar 2 : अभिनेता अजय देवगण याचा आगामी सन ऑफ सरदार 2 चित्रपट सध्या चर्चेत आहे. चित्रपटाची शूटींग सुरु असून या चित्रपटातून अभिनेता विजय राज याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. विजय राज याचा सेटवरील गैरवर्तनामुळे त्याला चित्रपटातून काढल्याचं मिडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे. मात्र, विजयने हे दावे फेटाळले असून यामागचं कारण अजय देवगण असल्याचं म्हटलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..
Bigg Boss Marathi Wild Card : काय सांगता...? बिग बॉसच्या घरात अभिजीत बिचुकले वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणार?
Bigg Boss Marathi Wild Card Entry : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन चांगलाचा चर्चेत आहे. बिग बॉस मराठीचा यंदाच्या सीझनने पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. यावेळी बिग बॉसच्या घरात कलाकारा मंडळींसह सोशल मीडिया एन्फ्लुएंसर्संनाही एन्ट्री देण्यात आली असून प्रत्येक सदस्याची जोरदार चर्चा आहे. या सीझनमध्ये निक्की आणि तिच्या टीमची खूपच चर्चा आहे. निक्की, जान्हवी, अरबाज आणि वैभवनं बिग बॉसचं घर जणू डोक्यावरच घेतलं आहे. यामुळे प्रेक्षकांकडून काही वाईल्ड कार्ड एन्ट्रीबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..
Bigg Boss Marathi : भाऊचा धक्का बोर व्हायला लागलाय, रितेशनं होस्टिंग बंद करायला हवी, महेश मांजरेकरच हवे होते; प्रेक्षक वैतागले, सोशल मीडियावर कमेंट्सचा पूर
Bigg Boss Marathi Host Ritiesh Deshmukh : बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन खूपच चर्चेत आहे. बिग बॉस मराठीच्या ग्रँड प्रीमियरपासूनच यंदाच्या सीझननं लक्ष वेधून घेतलं आहे. यंदा बिग बॉस मराठीचं घर, सदस्य, थीम आणि होस्ट सगळंच काही नवं आहे. यंदाच्या बिग बॉस मराठीच्या चक्रव्युहात सदस्य अडकल्याचं दिसत आहे. शोचा तिसरा आठवडा आता पूर्ण झाला आहे. यंदा बिग बॉस मराठीच्या सीझनने टीआरपीचा रेकॉर्डही मोडला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..
Prabhas Fauji Movie : 'कल्कि'तील 'भैरव'नंतर 'फौजी' होणार प्रभास, मिथुन चक्रवर्ती आणि जया प्रदा यांच्यासह तगडी स्टारकास्ट; पूजेने चित्रपटाला सुरुवात
Fauji Prabhas Upcoming Movie : सुपरस्टार अभिनेता प्रभास याच्या कल्कि 2898 एडी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला. नाग अश्निव दिग्दर्शित कल्कि 2898 एडी चित्रपटाने जगभरात रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. यानंतर आता चाहते त्याच्या आगामी चित्रपटाची वाट पाहत आहेत, असं असताना चाहत्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. प्रभाच्या आगामी चित्रपटाची पूजा पार पडली असून त्याच्या या प्रोजेक्टला आता सुरुवात झाली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)