Prabhas Fauji Movie : 'कल्कि'तील 'भैरव'नंतर 'फौजी' होणार प्रभास, मिथुन चक्रवर्ती आणि जया प्रदा यांच्यासह तगडी स्टारकास्ट; पूजेने चित्रपटाला सुरुवात
Prabhas Upcoming Movie : प्रभासच्या कल्कि 2898 एडी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केल्यानंतर तो आता फौजी चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
Fauji Prabhas Upcoming Movie : सुपरस्टार अभिनेता प्रभास याच्या कल्कि 2898 एडी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला. नाग अश्निव दिग्दर्शित कल्कि 2898 एडी चित्रपटाने जगभरात रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. यानंतर आता चाहते त्याच्या आगामी चित्रपटाची वाट पाहत आहेत, असं असताना चाहत्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. प्रभाच्या आगामी चित्रपटाची पूजा पार पडली असून त्याच्या या प्रोजेक्टला आता सुरुवात झाली आहे.
'कल्कि'तील 'भैरव'नंतर 'फौजी' होणार प्रभास
प्रशांत नीलच्या 'सालार : पार्ट 1' (Salaar: Part 1 - Ceasefire) आणि नाग अश्विनच्या 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD) नंतर प्रभास (Prabhas) आणखी एका बिग बजेट चित्रपटात झळकणार आहे. कल्कि चित्रपटामुळे चाहत्यांमध्ये प्रभासची क्रेझ पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता प्रभासच्या आगामी चित्रपटाबाबत अपडेट समोर आली आहे. नुकतीच त्याच्या आगामी चित्रपटाचा शूभ मुहूर्त पार पडला. यावेळी श्री गणेश आणि देवीसमोर चित्रपटाची स्क्रिप्ट ठेवून त्याची पूजा करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या नावाची अद्याप घोषणा झालेली नाही.
मिथुन चक्रवर्ती आणि जया प्रदा यांच्यासह तगडी स्टारकास्ट
प्रभास दिग्दर्शक हनु राघवपुडी यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. शनिवारी हैदराबादमध्ये एका पूजा समारंभाने हा चित्रपटाचा शुभारंभ करण्यात आला. निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाचं नाव अद्याप जाहीर केलेलं नाही, मात्र मैत्री मुव्ही मेकर्स (Mythri Movie Makers) निर्मात्यां च्या या चित्रपटाचं नाव 'फौजी' असण्याची चर्चा आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि अभिनेत्री जया प्रदा हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
चित्रपटाचा शुभ मुहूर्त
The duo everyone will fall in love with 🫶
— Mythri Movie Makers (@MythriOfficial) August 17, 2024
Scintillating frames of our Darling & #Imanvi from the #PrabhasHanu pooja ceremony ✨
Shoot commences soon.
Rebel Star #Prabhas @hanurpudi #MithunChakraborty #JayaPrada @Composer_Vishal @kk_lyricist @MrSheetalsharma @sudeepdop… pic.twitter.com/DNHGeeTgr1
प्रभासच्या नवीन चित्रपटाच्या अधिकृत घोषणा करताना निर्मात्यांनी म्हटलं आहे की, 'प्रत्येक ऐतिहासिक घटना आपल्या भावना आणि विचारांशी जुळत नाही, पण ही कथा एका योद्ध्याने आपल्या मातृभूमीतील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी लिहिली आहे. 1940 च्या दशकात घडलेला, इतिहास हा एका अशा योद्ध्याची कथा आहे, जो अंधारातून उदयास आला, ज्या समाजात दडपल्या गेलेल्या अन्यायांवर आणि विसरलेल्या सत्यांना इतिहासाने लपवून ठेवलं होतं असे मानणाऱ्या समाजातून ही कथा उदयास आली.'
महत्त्वाच्या इतर बातम्या :