एक्स्प्लोर

Mohammed Siraj Vs Travis Head : मॅथ्यू हेड सिराजला नेमकं काय म्हणाला आणि डीएसपी खवळला? खेळ संपताच फक्त दोन शब्दात उत्तर!

Mohammed Siraj Vs Matthew Head : मोहम्मद सिराजने त्याच्या अप्रतिम यॉर्कर चेंडूने हेडला चकवले आणि क्लीन बोल्ड झाला. यानंतर जाताना हेड काही उद्देशून बोलताच सिराज खूप रागावलेला दिसला.

Mohammed Siraj Vs Matthew Head : ॲडलेडमध्ये खेळल्या जात असलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेडने शानदार शतक झळकावले. या खेळीने भारताच्या अडचणी वाढल्या. हेडच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतावर आघाडी घेतली असून सामन्यावरील आपली पकडही मजबूत केली आहे. हेड त्याच्या झंझावाती फलंदाजीसाठी ओळखला जातो. शतक पूर्ण केल्यानंतर हेड अधिक मोकळेपणाने खेळत होता. सरतेशेवटी मोहम्मद सिराजने त्याचा डाव संपवला, पण पुढे जे घडले त्यामुळे संपूर्ण स्टेडियम सिराजच्या विरोधात फिरले. हेडने 141 चेंडूंचा सामना करत 17 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 140 धावा केल्या. हेडने सुरुवात संथगतीने केली, पण स्वत:ला सेट करताच वेगाने धावा केल्या. हेडने 111 चेंडूत आपले शतक पूर्ण केले, जे दिवस-रात्र कसोटी सामन्यातील सर्वात जलद शतक आहे.

ऑस्ट्रेलियन प्रेक्षक सिराजला शिव्या घालू लागले

मोहम्मद सिराजने अप्रतिम यॉर्कर चेंडूने हेडला चकवले आणि क्लीन बोल्ड झाला. यानंतर जाताना हेड काही उद्देशून बोलताच सिराज खूप रागावलेला दिसला. सिराजने हेडकडे बघत त्याला बाहेर जाण्याचा इशारा केला आणि काही शब्द सुद्धा बोलला. सिराजकडे बघून तो हेडला शिव्या घालतोय असे वाटले. दोघांमधील हे शाब्दिक युद्ध पाहून संपूर्ण स्टेडियममध्ये एकच गोंधळ उडाला आणि ऑस्ट्रेलियन प्रेक्षक सिराजला शिव्या घालू लागले. जेव्हा हेड पॅव्हेलियनमध्ये परत जात होता तेव्हा सर्वांनी उभे राहून त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या.

खेळ संपताच हेड काय म्हणाला?

खेळ संपताच ट्रॅव्हिस हेड म्हणाला, "मी म्हणालो की सिराजने चांगली गोलंदाजी केली, मला शेडच्या दिशेने दाखवल्यानंतर त्याने माझ्यापासून थोडेसे मागे आला. ज्याप्रकारे हे घडले त्याबद्दल थोडा निराश झाला. जर त्याला तशी प्रतिक्रिया द्यायची असेल तर आणि तुम्हाला असेच करायचे आहे, तर स्वतःचे प्रतिनिधित्व करत आहात"  

दरम्यान, या इनिंगमध्ये हेडने आपल्या झंझावाती फलंदाजीने मोठे विक्रम केले आहेत. दिवस-रात्र कसोटीत सर्वात जलद शतक झळकावणारा तो फलंदाज ठरला. त्याने स्वतःचाच विक्रम मोडला. हेडने 2022 मध्ये होबार्टमध्ये इंग्लंडविरुद्ध 112 चेंडूत शतक झळकावले होते. या यादीत हेडही तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2022 मध्ये त्याने ॲडलेडमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 125 चेंडूत शतक झळकावले होते. याशिवाय तो दिवस-रात्र कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. हेडने दिवस-रात्र कसोटी सामन्यात तीन शतके झळकावली आहेत. त्याच्या पुढे त्याच्याच देशाच्या मार्नस लॅबुशेनचे नाव आहे ज्याच्या नावावर चार शतके आहेत. पाकिस्तानचा असद शफीक आणि श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने यांनी प्रत्येकी दोन शतके झळकावली आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतासह जगभरात 2026 ची उत्साहात सुरुवात; जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत आनंदोत्सव; चीन, जपान आणि सिंगापूरमध्ये आतषबाजी, ऑस्ट्रेलियामध्ये नदीकाठावर लाखो लोक जमले
भारतासह जगभरात 2026 ची उत्साहात सुरुवात; जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत आनंदोत्सव; चीन, जपान आणि सिंगापूरमध्ये आतषबाजी, ऑस्ट्रेलियामध्ये नदीकाठावर लाखो लोक जमले
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतासह जगभरात 2026 ची उत्साहात सुरुवात; जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत आनंदोत्सव; चीन, जपान आणि सिंगापूरमध्ये आतषबाजी, ऑस्ट्रेलियामध्ये नदीकाठावर लाखो लोक जमले
भारतासह जगभरात 2026 ची उत्साहात सुरुवात; जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत आनंदोत्सव; चीन, जपान आणि सिंगापूरमध्ये आतषबाजी, ऑस्ट्रेलियामध्ये नदीकाठावर लाखो लोक जमले
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget