एक्स्प्लोर
'सैराट' चित्रपटाची टीम उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर

मुंबई : 'सैराट' चित्रपटातील कलाकार आणि दिग्दर्शक नागराज मंजुळेनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. 'सैराट'मध्ये काम केलेल्या मुलांचं यश अवाक करणारं आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे. 'सैराट'मध्ये काम केलेल्या मुलांचं यश अवाक करणारं आहे,या सगळ्यांची कारकीर्द अशीच बहरत राहू दे आणि उत्तरोत्तर याच्याहून अधिकाधिक यश मिळू दे, अशी प्रार्थना उद्धव यांनी केली. दुपारी एकच्या सुमारास सैराटची टीम मातोश्रीवर हजर होती. मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील प्रेक्षकांच्या कौतुकाची थाप मिळवणाऱ्या 'सैराट' चित्रपटाची टीम आज मातोश्रीवर जाणार आहे. चित्रपटातील मुख्य कलाकार मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. नागराज मंजुळेंसह आर्ची-परशा साकारणारे रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर तमाम रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या कौतुकाची थापही त्यांच्या पाठीवर पडणार आहे. अनेक चित्रपट महोत्सवात आपली छाप पाडणाऱ्या सैराटची आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेतली जात आहे. सैराटने नटसम्राट चित्रपटालाही कमाईच्या बाबतीत मागे टाकलं होतं. ‘सैराट’ मराठीत सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या तरुण-तरुणीच्या प्रेमकथेनं प्रेक्षकांच्या मनावर अक्षरश: गारुड घातलं असल्याचंही फोर्ब्सनं म्हटलं आहे.
संबंधित बातम्या :
आर्ची-परशा आता गुजराती-तेलुगूत, 'सैराट'चा लवकरच रिमेक
आर्ची-परशाचं खरं फेसबुक पेज कोणतं?
नाशकात प्रेक्षकांची हुल्लडबाजी, आर्ची-परशाचा काढता पाय
'सैराट'नं रचला इतिहास... तुफानी कमाई, झिंगाट सेलिब्रेशन!
'सैराट'च्या शिरपेचात मानाचा तुरा, जगप्रसिद्ध 'फोर्ब्स'कडून दखल
'त्या' संवादामुळे प्रणिता पवार यांची नागराज मंजुळेंना नोटीस
इमारतीच्या जिन्यात चाहत्यांचा गराडा, 'सैराट' टीमला...
आपल्याकडे जगणं नाही, पण सिनेमे गांभीर्यानं घेतात
रिंकू राजगुरु आंतरजातीय विवाह योजनेची ब्रँड अँबेसेडर?
नाराज परशाचं चाहत्यांना आवाहन
डॅशिंग आर्चीला मुख्यमंत्र्यांचा पहिला प्रश्न…..
‘सैराट’ची रेकॉर्डब्रेक कमाई, 11 दिवसात ‘नटसम्राट’ला धोबीपछाड
“नाग्या, तुझी कला जखमेतून येतेय. ती जखम भळभळत राहो.”
सोलापूरच्या नागराज मंजुळेची बॉलिवूडमध्ये काय चर्चा?
“हॅलो, आर्ची अभिनंदन’!, अहो मी आर्ची नाही, उद्योगमंत्री बोलतोय”
सांगलीत ‘आर्ची’च्या झिंगाट चाहत्यांवर लाठीमार
रिव्ह्यू : याड लावणारा ‘सैराट’
आणखी वाचा























