Shabaash Mithu : 'ती माझ्यासारख्या लाखो लोकांना प्रेरणा देते'; तापसी पन्नूने शेअर केले 'शाबास मिथू'चे नवे पोस्टर
Shabaash Mithu : 'शाबास मिथू' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
![Shabaash Mithu : 'ती माझ्यासारख्या लाखो लोकांना प्रेरणा देते'; तापसी पन्नूने शेअर केले 'शाबास मिथू'चे नवे पोस्टर Taapsee Pannu Releases A New Poster Of Sports Drama Shabaash Mithu On Womens Day Shabaash Mithu : 'ती माझ्यासारख्या लाखो लोकांना प्रेरणा देते'; तापसी पन्नूने शेअर केले 'शाबास मिथू'चे नवे पोस्टर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/08/0c1db2d695557efab53e3765bbc264f2_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shabaash Mithu : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने (Taapsee Pannu) तिच्या आगामी 'शाबास मिथू' (Shabaash Mithu) सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. 'शाबास मिथू' हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. खास महिला दिनानिमित्त या सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
पोस्टरमध्ये तापसीने हातात हेल्मेट आणि बॅट घेतलेली दिसत आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा असणार आहे. तापसीने सिनेमाचे नवे पोस्टर शेअर करत लिहिले आहे, ती माझ्यासारख्या लाखो लोकांना प्रेरणा देते. अनेक महिलांना पुढे जाण्यासाठी ती प्रयत्न करते.
View this post on Instagram
'शाबस मिथू' सिनेमाचे दिग्दर्शन सृजित मुखर्जी यांनी केले आहे. नुकतेच या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. मिताली राजचा प्रेरणादायी प्रवास दाखवण्यासाठी निर्मात्यांनी युनायटेड किंगडमसह देशांतर्गत या सिनेमातील भाग चित्रित केले आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या
Man Udu Udu Zhala : सानिका आई होणार... पण दिपू घरच्यांना सांगणार का सानिका आणि कार्तिकच्या लग्नाचं सत्य?
Ananya: आता महिला जे ठरवतील ते करुन दाखवतील, कारण 'अनन्या' येतेय; 'या' दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित
Hemangi Kavi : महिला दिनानिमित्त हेमांगी कवीकडून पोस्ट शेअर; म्हणाली 'खूप खालच्या पातळीला जाऊन हिणवलं'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)