एक्स्प्लोर

SSR Suicide Case | रिया चक्रवर्तीचा ईडीकडे मोठा खुलासा; म्हणाली - 'युरोप टूरमध्ये एक चित्र पाहून बिथरला होता सुशांत'

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात दिवसागणित नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. अशातच सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने ईडीकडे मोठा खुलासा केला आहे.

मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास सीबीआय करत आहे आणि दुसरीकडे आर्थिक व्यवहार प्रकरणी ईडीकडूनही चौकशी केली जात आहे. 2 दिवसांपूर्वी ईडीने सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, भाऊ शोविक आणि तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांची चौकशी केली.

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाने ईडीला सांगितलं की, गेल्या वर्षी जेव्हा सुशांत आणि ती युरोप टूरसाठी गेले होते. त्यावेळी त्याची तब्ब्येत बिघडली होती. रिया, तिचा भाऊ शौविक आणि सुशांत सिंह राजपूत ऑक्टोबर 2019 मध्ये युरोप टूरसाठी गेले होते. युरोप टूर दरम्यान, ते इटलीतील फ्लोरेंस शहरातील 600 वर्षांपूर्वीच्या एका हॉटेलमध्ये थांबले होते. सुशांत वेगळ्या रुममध्ये थांबला होता. तर शौविक आणि रिया एकाच रुममध्ये होते.

रियाने सांगितलं की, या जुन्या हॉटेलमध्ये गोयाचं एक पेटिंग होतं. फ्रान्सिस्को गोया एक स्पॅनिश आर्टिस्ट आहेत. या पेटिंगमध्ये ग्रीक गॉड सॅटर्न यांचं आपल्या मुलाला खातानाचं एक चित्र आहे. ज्याला Saturn Devouring his son असं नाव देण्यात आलं आहे. रियाने सांगितलं की, त्यानंतरपासूनच सुशांत मानसिकरित्या कधीच नॉर्मल होऊ शकला नाही.

पाहा व्हिडीओ :  रियाचा ईडीकडे मोठा खुलासा; 'हे' चित्र पाहून सुशांत बिथरला होता

रियाने ईडीला सांगितलं की, 'दुसऱ्या दिवशी जेव्हा मी सुशांतच्या रुममध्ये गेले, तेव्हा पाहिलं की, सुशांत घाबरलेला होता आणि रुद्राक्षाची माळ हातात घेऊन नामस्मरण करत होता. सुशांतने रियाला सांगितलं की, तो रात्रभर झोपला नव्हता. सुशांतने सांगितलं की, त्याची आई त्याच्या स्वप्नात दिसली होती आणि इतर विचित्र गोष्टीही त्याला दिसत होत्या. हॉटेलमधून दुसरीकडे जाऊ असंही सुशांत म्हणाला होता.'

रियाने ED ला सांगितलं की, 'ही युरोप टूर 2 नोव्हेंबर रोजी संपणार होती, पण आम्ही लवकर परत आलो. त्या रात्रीनंतर पुढच्या दिवशी सकाळी आम्ही ते हॉटेल सोडलं आणि ऑस्ट्रियासाठी रवाना झालो. तिथे मला डिटॉक्स करायचं होतं, पण सुशांतने केलं नाही. त्याची तब्येतही बरी नव्हती आणि त्यामुळेच आम्ही आमची युरोप टूर 5 दिवसांत आटोपली. 28 ऑक्टोबर रोजी मुंबईत पर आलो. सुशांतलाही एका रिहॅबमध्ये घेऊन जायचं होतं. पण तो आला नाही.

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Jaykumar Gore : जयकुमार गोरेंविरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी; कोरोना काळात गैरव्यवहाराचा आरोप
जयकुमार गोरेंविरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी; कोरोना काळात गैरव्यवहाराचा आरोप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi NewsBuldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Jaykumar Gore : जयकुमार गोरेंविरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी; कोरोना काळात गैरव्यवहाराचा आरोप
जयकुमार गोरेंविरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी; कोरोना काळात गैरव्यवहाराचा आरोप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
Embed widget