एक्स्प्लोर

SSR Suicide Case | 'विनाकारण माझा छळ चाललाय'; सूरज पांचोलीची वर्सोवा पोलिसांत तक्रार

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सातत्याने सूरज पांचोलीचं नाव घेतलं जात आहे. याप्रकरणी सूरज पांचोलीने आता थेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. वर्सोवा पोलिसांत त्याने तक्रार दाखल केली असून, त्यात त्याने दिशा सॅलियन आणि सुशांतच्या मृत्यू प्रकरणात आपल्याला विनाकारण गोवलं जात असल्याचं म्हटलं आहे.

मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याच्या या प्रकरणाने अनेक वेगवेगळी वळणं घेतली आहेत. त्याच्या केसमध्ये अनेक नवनवीन नावं समोर येऊ लागली आहेत. यात सातत्याने रिया चक्रवर्तीचं नाव आहेच. पण त्याही पलिकडे त्याच्या आणि दिशा सॅलियनच्या मृत्यूमध्ये सूरज पांचोलीचं नावही सातत्याने येऊ लागलं आहे. एका वाहिनीने तसा फोटो देऊन सूरज आणि दिशाची लिंक लावली होती. पण तो फोटो चुकीचा असल्याचं सूरजने आपल्या इन्स्टाग्रामवरून सांगितलं होतं. आता त्याने त्यापुढे पाऊल टाकलं आहे.

सूरज पांचोलीने आता थेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. वर्सोवा पोलिसांत त्याने तक्रार दाखल केली असून, त्यात त्याने दिशा सॅलियन आणि सुशांतच्या मृत्यू प्रकरणात आपल्याला विनाकारण गोवलं जात असल्याचं म्हटलं आहे. त्याने यात छळवणुकीची तक्रार दाखल केली आहे. एका राष्ट्रीय वाहिनीने एका डिबेट शोमध्ये सूरज पांचोलीचा एक फोटो दाखवत त्याच्या सोबत असलेली मुलगी ही दिशा सॅलियन असल्याचं म्हटलं होतं. त्या फोटोत सुशांतसिंह राजपूतही होता. त्या फोटो सूरजला चिकटून असलेली मुलगी दिशा सॅलियन असल्याचा दावा या चॅनलवर केला होता. आपल्या इन्स्टा अकाऊंटवरून त्यावर उत्तर देताना हा फोटो खरा असला तरी त्यात दिशा सॅलियन नसून आपली मैत्रिण अनुश्री गौर असल्याचं म्हटलं आहे. ती आत्ता लंडनमध्ये असल्याचंही तो सांगतो. याच प्रकरणात त्याने आता पोलिसांत आपली तक्रार दाखल केली आहे.

केवळ एक वाहिनी नव्हे, तर एका मोठ्या राजकिय नेत्यानेही एका पत्रकार परिषदेत सूरजचं नाव घेतलं होतं. त्यात दिशाच्या मृत्यूला सूरज जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. मिळालेल्या माहीतीनुसार, संबंधित चॅनल आणि तो राजकिय नेता या दोघांची नावं या तक्रारीत असल्याचं कळतं. सुशांंतसिंह राजपूतच्या प्रकरणात आता अनेक नव्या बाबी समोर येऊ लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच सामनातून आलेल्या अग्रलेखावरून सुशांतचा भाऊ खासदार संजय राऊत यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं कळतं.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Dev Anands Son Suniel Anand: बॉलिवूडवर शोककळा! ज्या ठिकाणी देव आनंद यांचा मृत्यू, त्याच रुग्णालयात मुलाने घेतला अखेरचा श्वास, कारणही समोर
बॉलिवूडवर शोककळा! ज्या ठिकाणी देव आनंद यांचा मृत्यू, त्याच रुग्णालयात मुलाने घेतला अखेरचा श्वास, कारणही समोर
Kangana Ranaut Statement Gen Z: तरुणींना 'गटार छाप' म्हटल्यानंतर कंगना रणौतचं आणखी वादग्रस्त वक्तव्य, जेन झीच्या आई-वडिलांबाबत नेमकं काय म्हणाली?
तरुणींना 'गटार छाप' म्हटल्यानंतर कंगना रणौतचं आणखी वादग्रस्त वक्तव्य, जेन झीच्या आई-वडिलांबाबत नेमकं काय म्हणाली?
Bhetali Tu Punha Sequel: 'भेटली तू पुन्हा' लव स्टोरीच्या पुढची स्टोरी; वैभव तत्ववादी, पूजा सावंत पुन्हा एकत्र, कधी रिलीज होणार?
'भेटली तू पुन्हा' लव स्टोरीच्या पुढची स्टोरी; वैभव तत्ववादी, पूजा सावंत पुन्हा एकत्र, कधी रिलीज होणार?
'गटार छाप, आई-बापाच्या जीवावर ऐश, ड्रग्ज, दारू घेणाऱ्या, कित्येकांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या...'; हिंदू तरुणींबाबत कंगना नको नको ते बरळली
'गटार छाप, आई-बापाच्या जीवावर ऐश, ड्रग्ज, दारू घेणाऱ्या, कित्येकांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या...'; हिंदू तरुणींबाबत कंगना नको नको ते बरळली

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget