SSR Suicide Case | होय, नाही करता-करता अखेर रिया चक्रवर्ती चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल
सीबीयाकडून रिया चक्रवर्तीसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ईडीकडूनही रियाची चौकशी आज करण्यात येणार आहे. रिया चक्रवर्ती या चौकशीसाठी उपस्थित राहणार की, नाही? यावरुन अनेक शंका-कुशंका उपस्थित करण्यात येत होत्या.
मुंबई : सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाने एक नवं वळण घेतलं आहे. सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती तपासाच्या दुहेरी कचाट्यात सापडली आहे. सीबीयाकडून रिया चक्रवर्तीसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ईडीकडूनही रियाची चौकशी आज करण्यात येणार आहे. रिया चक्रवर्ती या चौकशीसाठी उपस्थित राहणार की, नाही? यावरुन अनेक शंका-कुशंका उपस्थित करण्यात येत होत्या. अशातच रिया चक्रवर्तीने चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजेरी लावली आहे. दरम्यान, ईडीने समन्स बजावल्यानंतर कोरोना होण्याच्या भितीमुळे रिया चौकशीसाठी उपस्थित राहणार नसल्याचं बोललं जात होतं.
रिया चक्रवर्तीच्या वकीलांनी ईडीकडे विनंती केली होती की, सुप्रीम कोर्टात सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी सुनावणी सुरु आहे. तोपर्यंत याप्रकरणी ईडीने रियाची चौकशी करू नये. परंतु, ईडीने रियाच्या वकिलांचा विनंती अर्ज फेटाळला. 12 वाजता ईडीने रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यासाठी रिया ईडी कार्यालयात आपला जबाब नोंदवण्यासाठी पोहोचली आहे.
ईडीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या चौकशीदरम्यान याप्रकरणी ज्या बाबी समोर आल्या आहेत. त्या आधारावर ईडीने याप्रकरणी रियाच्या चौकशीसाठी प्रश्नावली तयार केली आहे. ज्यामध्ये 3 टप्प्यांमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. याप्रश्नांमधील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की, सुशांतने आपली बँक खाती ऑपरेट करण्याचा अधिकार रियाला दिला होता? दरम्यान, चौकशी दरम्यान, खुलासा झाला आहे की, काही दिवसांपूर्वीच रिया चक्रवर्तीने खारमध्ये दोन फ्लॅट खरेदी केले होते.
पाहा व्हिडीओ : अखेर रिया चक्रवर्ती चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल
महत्त्वाचं म्हणजे, अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआयने अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह सहा इतर लोकांविरोधात एफआयआर दाखल केले आहेत. एफआयआरमध्ये रिया व्यतिरिक्त इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, शमूएल मिरांडा, श्रुति मोदी आणि अन्य एका नावाचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- सुशांत सिंह राजपूत प्रकरणात CBI कडून रिया चक्रवर्तीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
- 8 जूनपासून आत्महत्येच्या दिवसापर्यंत, सुशांत-रियामध्ये संभाषण नाही, कॉल डिटेल्समधून खुलासा
- Sushant Singh Rajput Case | ...म्हणून सुशांतचं पार्थिव घेऊन जाणाऱ्या अॅम्ब्युलन्स ड्रायव्हरला मिळतायत धमक्या!
- सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत होणार, बिहार सरकारची शिफारस केंद्राकडून मान्य
- 25 फेब्रुवारीला कोणतीही लेखी तक्रार आली नव्हती, सुशांतच्या वडिलांच्या दाव्यावर मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण
- सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी निषेधार्ह : गृहमंत्री अनिल देशमुख
- पुजेसाठी सुशांतच्या खात्यातून लाखो रुपये खर्च; बँक खात्याच्या स्टेटमेंटमधून धक्कादायक खुलासा