(Source: ECI/ABP News/ABP Majha)
8 जूनपासून आत्महत्येच्या दिवसापर्यंत, सुशांत-रियामध्ये संभाषण नाही, कॉल डिटेल्समधून खुलासा
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वी रिया सुशांतला सोडून गेली होती. त्यानंतर रिया आणि सुशांत यांच्यात काहीच बोलणं झालं नव्हतं.
मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. याप्रकरणी सध्या सीबीआय चौकशीला मान्यता मिळाली असून ईडीकडूनही याप्रकरणी चौकशी सुरु आहे. ईडीने सुशांत सिंह राजपूतच्या बँक अकाउंटमधून काढण्यात आलेल्या पैशांसंदर्भात अभिनेत्री आणि सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला नोटीस पाठवली आहे. दरम्यान, अद्याप रिया चक्रवर्तीची ईडीकडून अद्याप चौकशी करण्यात आलेली नाही. परंतु, ईडीने रियाच्या सीएची चौकशी केली आहे. या चौकशीदरम्यान, अनेक महत्त्वाच्या बाबी स्पष्ट झाल्या आहेत. सुशांत आणि रिया यांच्यातील आर्थिक व्यवहारासंबंधी अनेक संशयित गोष्टी समोर आल्या आहेत. त्याबरोबर रिया आणि सुशांत यांच्यात बऱ्याच काळापर्यंत बोलणं झालं नव्हतं.
सुशांतच्या मृत्यूपूर्वीच्या एका आठवड्यापूर्वीच्या कॉल रेकॉर्डनुसार, रिया आणि सुशांत यांच्यात बोलणं होत नव्हतं. 8 जून ते 14 जून दरम्यान यादोघांमध्ये अजिबात बोलणं झालं नव्हतं. आणखी एक गोष्ट कॉल रेकॉर्ड्समधून समोर आली होती की, सुशांत आपल्या बहिणींच्या सतत संपर्कात होता.
पाहा व्हिडीओ : 8 ते 14 जूनदरम्यान रियासोबत एकदाही फोनवरून संवाद नाही : सूत्र
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वी रिया सुशांतला सोडून गेली होती. त्यानंतर रिया आणि सुशांत यांच्यात काहीच बोलणं झालं नव्हतं. सुशांतचे वडिल के.के सिंह आणि त्याची बहिण यासंदर्भातही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कारण असं सांगण्यात येत आहे की, सुशांतने आत्महत्येपूर्वी रियासा अनेकदा फोन केला होता. परंतु, सुशांतने फोन उचलला नव्हता. ईडीने रियाच्या चौकशीसाठी अनेक प्रश्नांची यादी तयार केली आहे. जर रिया चौकशीसाठी आली नाही, तर तिला पुन्हा एकदा नोटीस पाठवण्यात येणार आहे.
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत होणार
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय तपास करण्याची बिहार सरकारची शिफारस केंद्र सरकारने स्वीकारली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत होणार आहे. बिहार सरकारने मंगळवारी (4 ऑगस्ट) सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सीबीआय तपासाची शिफारस केंद्र सरकारला केली होती. सुशांत सिंहच्या आत्महत्येचा तपास सीबीआयमार्फत करावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. यानंतर आज सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणी केंद्र सरकारचे वकील महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं की, या प्रकरणाचा सीबीआय तपास करावा ही बिहार सरकारची शिफारस मान्य करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत होणार, बिहार सरकारची शिफारस केंद्राकडून मान्य
- 25 फेब्रुवारीला कोणतीही लेखी तक्रार आली नव्हती, सुशांतच्या वडिलांच्या दाव्यावर मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण
- सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी निषेधार्ह : गृहमंत्री अनिल देशमुख
- पुजेसाठी सुशांतच्या खात्यातून लाखो रुपये खर्च; बँक खात्याच्या स्टेटमेंटमधून धक्कादायक खुलासा
- Sushant Singh Rajput Case | सुशांतच्या केसमध्ये घडतंय काय?