एक्स्प्लोर

Crime news: पारनेरमध्ये वारकरी संप्रदायाला काळिमा, वासनांध कीर्तनकार महाराजाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Ahilyanagar news: ढवळपुरी हादरले! कीर्तनकार 'महाराजा'चा अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार. आरोपीला पारनेर पोलिसांकडून तात्काळ अटक. वारकरी शिक्षण संस्थेच्या नावाखाली वासनेचा बाजार

Crime news Ahilyanagar: अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील ढवळीपूर गावात वारकरी संप्रदायाच्या लौकिकाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका कीर्तनकाराने (Kirtankar) अल्पवयीन मुलीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण (Sexual Assault) केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पारनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ (महाराज) (वय 38) याने एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मागील पाच वर्षांपासून धाक दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीला गरम लोखंडी पक्कडीने चटके देऊन अमानुष मारहाण केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. (Maharashtra Crime news)

यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ हा गेल्या पाच वर्षांपासून या मुलीवर अत्याचार करत होता. याबाबत मुलीच्या भावाने पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर अण्णासाहेब गुंजाळला पोलिसांनी रविवारी पहाटे चार वाजता बेड्या ठोकल्या असून त्याच्याविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने नराधम अण्णासाहेब गुंजाळला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले. त्यामुळे आता पोलीस चौकशीतून कोणती नवीन माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता आठवीत असल्यापासून हा प्रकार सुरू होता. आरोपी यशवंत थोरात हा पीडितेच्या शेजारीच राहत असल्याने दोन्ही कुटुंबांचे घरोब्याचे संबंध होते. पीडितेचा भाऊ आरोपीच्याच वारकरी शिक्षण संस्थेत सचिव म्हणून कार्यरत आहे. याचाच फायदा घेऊन आरोपीने 2021पासून पीडितेवर वाईट नजर ठेवली होती. मुलगी घरी एकटी असताना किंवा आरोपीच्या घरी कोणी नसताना त्याने वारंवार तिच्यावर बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले.

​पीडितेने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. 'मी दोन हाफ मर्डर केलेले आहेत, जर कोणाला काही सांगितले तर तुझ्या आई-वडिलांना आणि भावाला मारून टाकीन', अशी भीती तो घालत होता. कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी पीडितेने हा छळ मुकाट्याने सहन केला.

​घटनेचा थरार 10 मार्च 2026 रोजी शिगेला पोहोचला. आरोपीने पीडितेला फोन करून त्याच्या घरी बोलावले. तिने येण्यास नकार दिला असता, त्याने कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली. भीतीपोटी पीडिता त्याच्या घरी गेली असता, तू लवकर का आली नाहीस, असे विचारत आरोपीने तिला मारहाण करायला सुरुवात केली. आरोपीने तिला कॉम्प्युटर रूममध्ये नेऊन बांबूने व चापटीने बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, नराधम आरोपीने स्वयंपाकाची लोखंडी पक्कड गॅसवर गरम करून पीडितेच्या चटके दिले. या अमानुष कृत्यानंतरही त्याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला जाळून टाकेन, घरात एकही माणूस ठेवणार नाही, अशी धमकीही नराधमाने पीडितेला दिली.

​मारहाण आणि चटक्यांमुळे पीडितेला चालणेही कठीण झाले होते. 14 मार्च रोजी तिचा भाऊ घरी आला असता, तिला गंभीर अवस्थेत पाहून त्याने विश्वासात घेतले. मावस भावांच्या उपस्थितीत पीडितेने आपल्यावर झालेला पाच वर्षांचा अन्याय कथन केला. त्यानंतर पीडितेच्या भावाने पारनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पारनेर पोलिसांनी याप्रकरणी यशवंत एकनाथ थोरात विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात संताप व्यक्त होत असून, आरोपी यशवंत महाराज थोरात यांना पारनेर पोलिसांनी पहाटे चार वाजता अटक केली आहे या अशा 'भोंदू' महाराजावर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

आणखी वाचा

गुप्तधनाच्या नावाने खणलेल्या खड्ड्यात प्राध्यापकाला पुरलं, 'क्राइम पेट्रोल'च्या स्टोरीलाही लाजवेल असा प्लॅन रचला पण अखेर पोलिसांच्या ताब्यात सापडलेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये नक्की काय घडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Yavatmal : मटण अर्धवट शिजल्याचा पतीला राग, अपमान सहन न झाल्याने पत्नीने संपवल जीवन
मटण अर्धवट शिजल्याचा पतीला राग, अपमान सहन न झाल्याने पत्नीने संपवल जीवन
Nashik Crime News: तरुणीच्या गळ्यातील तुळशीमाळ अन् हातात बांधलेला दोरा काढला, मानेवर लव्ह बाईट, नाशिकमधील आणखी एक हादरवणारी कहाणी
तरुणीच्या गळ्यातील तुळशीमाळ अन् हातात बांधलेला दोरा काढला, मानेवर लव्ह बाईट, नाशिकमधील आणखी एक हादरवणारी कहाणी
Amravati Crime News: हाय हॅलो करत बसायचं नाही तर, एकच प्रश्न थेट विचारायचा अन्...; अमरावती व्हिडीओकांड प्रकरणातील मास्टमाईंड अयानला 'लव्ह गुरु'च्या टिप्स
हाय हॅलो करत बसायचं नाही तर, एकच प्रश्न थेट विचारायचा अन्...; अमरावती व्हिडीओकांड प्रकरणातील मास्टमाईंड अयानला 'लव्ह गुरु'च्या टिप्स
Bharat Ganeshpure: 'भोंदू बाबा म्हणतो, दुनिया झुकती हैं; झुकानेवाला....' अशोक खरात प्रकरणात 'चला हवा येऊ द्या' फेम भारत गणेशपुरे काय म्हणाले?
'भोंदू बाबा म्हणतो, दुनिया झुकती हैं; झुकानेवाला....' अशोक खरात प्रकरणात 'चला हवा येऊ द्या' फेम भारत गणेशपुरे काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान
Womens Reservation Bill Update : महिला आरक्षण विधेयक नामंजूरवर शिक्का, सरकारला मोठा धक्का
Vidhan Parishad Election : विधान परिषदेत ठाकरेंवरुन आघाडी नाहीतर बिघाडी? Special Report
Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
Iran War Live Update: अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
Iran War Live Update: 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
Priyanka Gandhi on BJP: संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
Jitendra Shelke Accident: अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
Embed widget