एक्स्प्लोर

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत होणार, बिहार सरकारची शिफारस केंद्राकडून मान्य

सुशांत सिंहच्या आत्महत्येचा तपास सीबीआयमार्फत करावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. बिहार सरकारनेही सीबीआय तपासाची शिफारस केली होती. या शिफारशीला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.

नवी दिल्ली : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय तपास करण्याची बिहार सरकारची शिफारस केंद्र सरकारने स्वीकारली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत होणार आहे. बिहार सरकारने मंगळवारी (4 ऑगस्ट) सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सीबीआय तपासाची शिफारस केंद्र सरकारला केली होती.

सुशांत सिंहच्या आत्महत्येचा तपास सीबीआयमार्फत करावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. यानंतर आज सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणी केंद्र सरकारचे वकील महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं की, या प्रकरणाचा सीबीआय तपास करावा ही बिहार सरकारची शिफारस मान्य करण्यात आली आहे.

दरम्यान सुशांतच्या मृत्यूप्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलीस सक्षम असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख वारंवार सांगत होते. त्यादरम्यानच पाटण्यात सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर बिहार मुंबईत पोहोचले आणि चौकशी करण्यास सुरुवात केली. यावरुन मुंबई पोलीस आणि बिहार पोलिसात संघर्षही झाला होता. अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. पाटण्याचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने क्वॉरन्टाईन केल्याने हा संघर्ष शिगेला पोहोचला. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 59 जणांचा जबाब नोंदवला आहे.

सुशांत सिंह राजपूत 14 जून रोजी मुंबईच्या वांद्र्यातील आपल्या घरी मृतावस्थेत आढळला होता. सुशांतने आत्महत्या केली या दृष्टीने मुंबई पोलीस तपास करत आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात रिया चक्रवर्तीसह हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांची चौकशी केली आहे. यामध्ये महेश भट यांच्यापासून संजय लीला भन्साली यांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
Kushal Badrike on Shourya Ambure: युथ ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकीचा डंका, कुशल बद्रिकेनं केलं कौतुक; 'शौर्या' नावावरुन नेमकं काय म्हणाला?
युथ ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकीचा डंका, कुशल बद्रिकेनं केलं कौतुक; 'शौर्या' नावावरुन नेमकं काय म्हणाला?
Deool Band Actress: 'माझं अन् आईचं वाईट कसं होईल...', 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीनं वडिलांचं नाव हटवलं; आईचं नाव जोडणार, कारण
'माझं अन् आईचं वाईट कसं होईल...', 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीनं वडिलांचं नाव हटवलं; आईचं नाव जोडणार, कारण
Sameera Reddy Nana Patekar Death: बॉलिवूड अभिनेत्रीकडून नाना पाटेकरांबाबत अनेक रहस्य उघड; मृत्यूच्या 1 महिन्यांनंतर सगळंच सांगितलं, म्हणाली, 'ते गुपचूप...'
बॉलिवूड अभिनेत्रीकडून नाना पाटेकरांबाबत अनेक रहस्य उघड; मृत्यूच्या 1 महिन्यांनंतर सगळंच सांगितलं, म्हणाली, 'ते गुपचूप...'

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Team India : टीम इंडियाचा 306 धावांनी विजय, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, प्रिन्स यादव, हर्षित राणाच्या गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजीचा पालापाचोळा
टीम इंडियानं उडवला नेपाळचा धुव्वा, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, भारताचा 306 धावांनी विजय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Embed widget