एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 6 Prajakta Shukre Eliminated: बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट; सेफ गेम, गॉसिफ महागात? सतत प्रेक्षकांचा विचार करुन खेळणारी 'ही' सदस्य एलिमिनेट

Bigg Boss Marathi 6 Prajakta Shukre Eliminated: प्राजक्ताच्या एलिमिनेशननंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काही प्रेक्षकांनी तिच्या शांत स्वभावाचं कौतुक केलं, तर काहींनी ती बाहेर पडल्याचा आनंद व्यक्त केलाय.

Bigg Boss Marathi 6 Prajakta Shukre Eliminated: 'बिग बॉस मराठी 6' (Bigg Boss Marathi 6) चा खेळ दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत चाललाय. वाईल्ड कार्ड स्पर्धकांच्या (Wild Card Contestant) एन्ट्रीनंतर घरातील समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. अशातच आता या आठवड्यातील एलिमिनेशन पार पडलंय. यंदाच्या आठवड्यात सतत प्रेक्षकांचा विचार करून खेळणारी गोड गळ्याची गायिका प्राजक्ता शुक्रे (Prajakta Shukre) हिला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागलं आहे. नवव्या आठवड्यात तिचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला आहे. प्राजक्ता घराबाहेर पडल्यानंतर आता घरात विशाल, अनुश्री, सागर, राकेश, तन्वी, दीपाली, प्रभू,  राखी, संकेत, रेवा, संस्कृती हे स्पर्धक उरले आहेत. आता यांच्यात टॉप 10 मध्ये सहभागी होण्यासाठी मोठी चुरस रंगताना पाहायला मिळणार आहे.

प्राजक्ताच्या एलिमिनेशननंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काही प्रेक्षकांनी तिच्या शांत स्वभावाचं कौतुक केलं, तर काहींनी ती गेममध्ये फारशी सक्रिय नव्हती, यापूर्वीच बाहेर जायला हवी होती, असं मत व्यक्त केलं. तर, काहींनी तर प्राजक्ता घरातून बाहेर पडल्याचा आनंद व्यक्त केला आहे.

Bigg Boss Marathi 6 मध्ये ट्विस्टचा भडिमार

'बिग बॉस मराठी 6' मध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. नुकतंच बिग बॉसनं एक-दोन नव्हे तर तब्बल तीन वाईल्ड कार्ड स्पर्धक घरात पाठवलेत. या नव्या स्पर्धकांच्या एन्ट्रीनंतर घरातील वातावरण अधिकच तापलं असून अनेक स्पर्धकांनी आपल्या सोयीनुसार, नवी समीकरणं तयार केली आहेत. त्यातच ड्रामा क्वीन राखी सावंत हिची एन्ट्री झाल्यामुळे घरातील वातावरण आणखी रंगतदार झालं आहे. राखी घरात गोंधळ घालायला करत असलेल्या प्लान्समुळे घरातील सदस्यांच्या नाकीनऊ येत आहेत. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात नवनवीन वाद, चर्चा आणि रणनीती पाहायला मिळतेय.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

प्राजक्ता शुक्रेचं नेमकं चुकलं काय?

प्राजक्ता शुक्रेनं बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतल्यापासून तिचे चाहते खूप आनंदी होते. गोड आवाज आणि शांत स्वभावामुळे तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली. पण, बिग बॉसच्या घरात केवळ शांत स्वभाव पुरेसा नसतो, तर गेममध्ये सक्रिय सहभाग महत्त्वाचा असतो. नेहमीच केवळ सेफ गेल, गॉसिप करणं यामुळे नंतर प्राजक्ता कुठेतरी खेळात कमी पडतेय, अशा चर्चाही रंगलेल्या. फक्त घराबाहेरच्या प्रेक्षकांनीच नव्हे तर घरातील इतर सदस्यांनीही प्राजक्ताचा काहीच गेम प्लान नाहीय, असं कारण देत बऱ्याचदा तिला एलिमिनेट केलेलं. 

'आयुर्वेदिक' नावामुळे आलेली चर्चेत

बिग बॉसच्या घरात प्राजक्ताचा स्वभाव खूप शांत असल्यामुळे तन्वी कोलतेनं तिला 'आयुर्वेदिक' असं नाव दिलं होतं. प्राजक्ता जेवढे दिवस घरात होती, तेवढे दिवस ती कधीच मोठमोठ्यानं वाद घालताना किंवा आरडाओरडा करताना दिसली नाही. पण, बिग बॉससारख्या रिअॅलिटी शोमध्ये स्वतःचा ठसा उमटवण्यासाठी आक्रमक गेम आणि स्पष्ट भूमिका आवश्यक असते. त्यामुळेच तिचा गेम प्रेक्षकांना फारसा दिसला नाही, असंही बोललं जात होतं.

दरम्यान, प्राजक्ताच्या एलिमिनेशननंतर आता बिग बॉसच्या घरातील समीकरणं पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील आठवड्यांत कोणता स्पर्धक गेममध्ये बाजी मारणार आणि कोण घराबाहेर जाणार, याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ruchita Jamdar On Vishal kotian: 'मुलगी पन्नास वर्षांच्या म्हाताऱ्यासोबत लफडं करतेय...'; बिग बॉसच्या घरात विशालसोबत रुचिताचं नाव जोडलं, ढसाढसा रडलेले वडील

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget