Monday Motivation : सनी लिओनीच्या झगमगत्या आयुष्यामागचं अंगावर शहारे आणणारं सत्य; 'आयटम गर्ल'च्या आयुष्याचे 'हे' आहेत फंडे
Sunny Leone : सनी लिओनीला सर्वच जण ओळखतात. सनीबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. सनी लिओनी आज लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली असली तरी तिला संघर्ष चुकलेला नाही.
Sunny Leone : सनी लिओनी (Sunny Leone) बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. सनी लिओनीने 2011 मध्ये सलमान खानच्या (Salman Khan) 'बिग बॉस 5'मध्ये (Bigg Boss) वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. या लोकप्रिय, वादग्रस्त कार्यक्रमाच्या माध्यमातून सनी लिओनी घराघरांत पोहोचली. पुढे 'जिस्म 2' या चित्रपटाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलिवूड गाजवण्याआधीही सनी लिओनी चर्चेत आली होती. अमेरिकेतील एका वेगळ्या चित्रपटसृष्टीतील ती स्टार होती. सनीची स्वत:ची निर्मितीसंस्था होती. सनीला हिंदी मनोरंजनसृष्टीत एका वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. त्यामुळे बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणं सनीसाठी फार महत्त्वाचं होतं.
अमेरिकेतल्या फिल्म इंडस्ट्रीत घालवले 10 वर्ष
सनीने अमेरिकेतल्या फिल्म इंडस्ट्रीत 10 वर्षे घालवली आहेत. त्यामुळे बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यानंतरही तिला प्रवास सोपा नव्हता. 2002-2003 दरम्यान तिने अमेरिकन फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं. या चित्रपटांची ती स्टार झाली होती.
सनीला भूतकाळ विसरायचा नाही...
सनीने वॉक द टॉक शोमध्ये शेखर गुप्ताला दिलेल्या मुलाखतीत आपल्या भूतकाळाबद्दल भाष्य केलं आहे. भूतकाळाला कधीही विसरायचं नव्हतं, असं ती म्हणाली. भूतकाळामुळे अनेकदा तिला ऑकवर्ड सिचुएशनचा सामना करावा लागला आहे. सनी म्हणाली,"मी माझ्या बदनाम भूतकाळाला कधीच विसरणार नाही. आज मी या भूतकाळामुळेच यश मिळवू शकले आहे. स्वत:च्या मर्जीने मी कामे निवडली आहेत".
सनी लिओनी म्हणाली,"माझी दु:खी स्टोरी नाही. माझी गोष्ट वाचून कोणालाही दया येणार नाही. मला कोणीही जबरदस्ती केलेली नाही. माझा आतापर्यंतचा प्रवास चढउतारांचा होता. मी भारतात आल्यानंतर लोक माझ्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहायचे. गेल्या अनेक वर्षांपासून सनी लिओनी कोणत्या ना कोणत्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत आहे. तर काही चित्रपटांमध्ये तिचं आयटम सॉन्ग असतंच. सनी लिओनी ज्या गाण्यावर थिरकते ते सुपरहिट होतं.
सनी लिओनी आयुष्यात यशस्वी झालेली आहे. आपल्या कामाच्या माध्यमातून ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. कोणी तुम्हाला खाली पाडत असेल तर घाबरुन न जाता पुन्हा उभं राहायला हवं तरच यश मिळेल. लोकांचा विचार मी करत बसले असते तर कधीच यशस्वी झाले नसते. सनी लिओनीच्या चमकदार आयुष्याच्या मागचं सत्य आहे की, ती कधीच सत्याला चुकीचं ठरवत नाही. त्यातून पळ काढत नाही. सनी लिओनीची हीच सुंदरता इतरांसाठी फायदेशीर ठरते. सनीच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या