Sunny Leone : साखरपुडा झाला, लग्नाची तारीख ठरली, पण होणाऱ्या नवऱ्यानं फसवलं अन् बेबीडॉल सनी लिओनीचं मोडलं पहिलं लग्न
Sunny Leone : सनी लिओनी हीने नुकतच तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला आहे. यामध्ये तिने तिचं लग्न मोडल्याचा खुलासा केला आहे.

Sunny Leone First Marriage : सनी लिओनी (Sunny Leone) ही सध्या तिचा नवरा डॅनियलसोबत आनंदानं आयुष्य जगतेय. ते दोघेही तीन मुलांचे पालक आहेत. सनी लिओनीने डॅनियलसोबत 9 एप्रिल 2011 मध्ये लग्न केलं. पण डॅनियलशी लग्न होण्याआधी तिचं एक लग्न मोडलं होतं. याबाबत अभिनेत्रीने नुकतच आयुष्यातील या प्रसंगाबाबत खुलासा केला आहे. सनी सध्या MTV Splitsvilla X5: ExSqueeze Me Please हा शो होस्ट करतेय.
सनी लिओनीने तिचं लग्न मोडलं त्यानंतर तिच्या आयुष्यातील त्या काळाविषयी देखील भाष्य केलं आहे. साखरपुडा झाल्यानंतर लग्नाला दोन महिने असताना तिला तिच्या होणाऱ्या नवऱ्याने नकार दिला होता. याचा खुलासा सनीने केला. तिच्या या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
View this post on Instagram
नेमकं काय घडलं?
स्प्लिट्सविलाच्या एका भागामध्ये एका स्पर्धकाचं सात्ंवन करताना सनीने तिच्या आयुष्यातला हा प्रसंग सांगितला. त्या स्पर्धकाला शांत करताना सनीने तिच्या आयुष्यताला हा प्रसंग सांगितला. यावर बोलतना सनीने म्हटलं की, डॅनियलची भेट होण्याआधी माझा साखरपुडा झाला होता. पण तरीही मला असं वाटलं की काहीतरी चुकतंय आणि मी बरोबर होते. माझा होणारा नवरा मला फसवत होता. तेव्हा मी त्याला विचारलं की तुझं माझ्यावर प्रेम आहे का? त्यावर त्याने मला नाही असं सांगितलं.
लग्नाची सगळी तयारी झाली होती - सनी लिओनी
सनी लिओनीने पुढे बोलताना सांगितलं की, लग्नाच्या दोन महिने आधी या सगळ्या गोष्टी झाल्या. लग्नाची तारीख ठरली होती, सगळी तयारी झाली होती. लग्नाचे कपडेही तयार होते. पण त्याआधीच सगळं संपलं. पण त्यानंतर माझी आणि डॅनियलची भेट झाली. माझ्या त्या काळातही तो माझ्याबरोबर खंबीरपणे उभा होता.
View this post on Instagram























