Subhedar : 'सुभेदार'ची विक्रमी कमाई! पहिल्या विकेंडला जमवला 8.74 कोटींचा गल्ला
Subhedar : 'सुभेदार' या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड सुरू आहे.

Subhedar Box Office Collection : 'सुभेदार' (Subhedar) या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड सुरू आहे. रिलीजआधी पासून चर्चेत असलेला हा ऐतिहासिक सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आतापर्यंत 'सुभेदार'ने विक्रमी कमाई केली आहे. पहिल्या विकेंडला या सिनेमाने 8.74 कोटींचा गल्ला जमवला आहे.
'सुभेदार' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.15 कोटी, दुसऱ्या दिवशी 1.68 कोटी, तिसऱ्या दिवशी 2.22 कोटी, चौथ्या दिवशी 90 लाख, पाचव्या दिवशी 95 लाख, सहाव्या दिवशी 1.04 कोटी, सातव्या दिवशी 80 लाखांची कमाई केली आहे. एकंदरीतचा आतापर्यंत या सिनेमाने 8.74 कोटींचा गल्ला जमवला आहे.
'सुभेदार'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Subhedar Box Office Collection)
- पहिला दिवस : 1.15 कोटी
- दुसरा दिवस : 1.68 कोटी
- तिसरा दिवस : 2.22 कोटी
- चौथ्या दिवस : 90 लाख
- पाचवा दिवस : 95 लाख
- सहावा दिवस : 1.04 कोटी
- सातवा दिवस : 80 लाख
- एकूण कमाई : 8.74 कोटी
दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टकातील 'सुभेदार' रूपी पाचवे चित्रपुष्प 25 ऑगस्टला रसिक दरबारी सादर केले आणि 350 चित्रपटगृहांतील 1000 हून अधिक शोजमधून प्रेक्षकांनीही विक्रमी प्रतिसाद दिल्याने शेकडो चित्रपटगृहांवर हाऊसफुल्लचे बोर्ड झळकल्याचे पहायला मिळातायेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातही 'सुभेदार' चित्रपटाची जोरदार घोडदौड सुरू आहे.
View this post on Instagram
पहिल्याच वीकेंडला चित्रपटाने पाच करोडहून अधिकची विक्रमी कमाई केली आहे. या जबरदस्त यशानंतर पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यातही 'सुभेदार' चित्रपटाची बॅाक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच राहील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
'सुभेदार' सिनेमातील गाण्यांना रसिकांचा जोरदार प्रतिसाद लाभत आहे. 'आले मराठे' या गाण्यावर सिनेमागृहांमध्येच रसिक बेधुंद होऊन भगवे झेंडे घेऊन नाचत आहेत. मुखानं 'जय भवानी, जय शिवाजी'चा जयघोष करत प्रेक्षकांचे लहान-मोठे गट एकत्रितपणे सिनेमा पहायला गर्दी करत आहेत.
‘सुभेदार’ सिनेमाने बॉक्स ऑफिसचा गड दणक्यात सर केला आहे.
विद्यार्थांसाठी 'सुभेदार'ची विशेष ऑफर
महाराष्ट्रातल्या शाळकरी विद्यार्थ्यांसाठी 'सुभेदार'च्या टीमने एक विशेष ऑफर ठेवली आहे. पीव्हीआर आणि आयनॉक्समध्ये प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येणार आहे. फक्त 140 रुपयांत प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतात. पण या विशेष ऑफरसाठी खास अटीदेखील आहेत.
संबंधित बातम्या
Subhedar : 'सुभेदार' सिनेमा महाराष्ट्रातल्या शाळकरी विद्यार्थांना सवलतीच्या दरात पाहता येणार; विशेष ऑफर काय? जाणून घ्या...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
