एक्स्प्लोर

Stree 2 Box office collection: 'स्त्री-2'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, पाचव्या दिवशीच पार केला कोट्यवधींचा टप्पा

Stree 2 Box office collection Day 5: राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या 'स्त्री 2' चित्रपटाने रक्षाबंधनाच्या दिवशी 200 कोटींचा टप्पा पार केला आहे.

Stree 2 Box Office collection Day 5: राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांच्या 'स्त्री 2' (Stree 2) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. हा सिनेमा 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित करण्यात आला. पहिल्याच दिवसापासून सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळालं. 

पाचव्या दिवशीही या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरुच आहे. रक्षाबंधनाच्या दिवशीही प्रेक्षकांनी या सिनेमाला तुफान प्रतिसाद दिला. पण मागील चार दिवसांचा विचार केला असता सोमवारच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळतंय. या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी जाणून घेऊयात. 

स्त्री 2 ने पार केला 200 कोटींचा टप्पा 

पहिल्या दिवशीच 50 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या 'स्त्री 2'ने रविवारी चौथ्या दिवशी 50 कोटींहून अधिक कमाई केली. सोमवारी या चित्रपटाच्या एकूण कलेक्शनने 200 कोटींचा आकडा पार केला आहे. सॅनसिल्कच्या अहवालानुसार स्त्री 2 ने सोमवारी रात्री 10:30 वाजेपर्यंत 37 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाचे आतापर्यंत एकूण कलेक्शन 228.45 कोटी रुपये झाले आहे. 

'स्त्री 2' चं चार दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन 

15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या स्त्री 2 ने पहिल्या दिवशी 51.8 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्याचप्रमाणे अॅडव्हान्स बुकींगमध्येच या सिनेमाने 8.5 कोटींची कमाई केली आहे. यानुसार स्त्री 2 ने पहिल्याच दिवशी 60.1 कोटींची कमाई केली होती.दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी 16 ऑगस्ट रोजी स्त्री 2 ने बॉक्स ऑफिसवर 31.4 कोटींची कमाई केली होती.

तिसऱ्या दिवशी, स्त्री 2 ने शुक्रवारपासून सर्वोत्तम कलेक्शन केले. शनिवारी 17 ऑगस्ट रोजी राजकुमार आणि श्रद्धाच्या चित्रपटाने 43.85 कोटी रुपयांची कमाई केली. रविवारी, त्याच्या रिलीजच्या चौथ्या दिवशी, चित्रपटाने चमकदार कामगिरी केली आणि बॉक्स ऑफिसवर 55.9 कोटी रुपयांचे रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले.

2024 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट

'स्त्री 2' तिसऱ्या दिवसाच्या कलेक्शनसह वर्षातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आता चौथ्या दिवसाच्या कमाईने या चित्रपटाने अजय देवगणच्या 'शैतान' चित्रपटाला मागे टाकले आहे. 'शैतान'ने भारतात 176.05 कोटी रुपयांची कमाई केली होती आणि वर्षातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा विक्रम त्याच्या नावावर होता. 'फायटर' या बॉलिवूडपटाने यंदाच्या वर्षात सर्वाधिक कमाई केली. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

ही बातमी वाचा : 

Stree 2 Box Office Collection Day 4 : बॉक्स ऑफिसला 'स्त्री-2'ची भुरळ; कमाईच्या बाबतीत सुपरसंडे, चार दिवसांचा गल्ला किती?

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget