एक्स्प्लोर

'रुप की रानी' श्रीदेवी यांची चित्रपट कारकीर्द

हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी श्रीदेवींनी तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्ल्याळम चित्रपटातही अभिनय केला आहे.

मुंबई : बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री अशी ओळख असलेल्या श्रीदेवी यांच्या अकाली मृत्यूने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी दुबईत कार्डिअॅक अरेस्टने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गंभीर असो वा विनोदी, त्यांच्या अनेक संवेदनशील भूमिका गाजल्या. नृत्यांगना म्हणूनही त्यांनी चाहत्यांच्या मनावर ठसा उमटवला. श्रीदेवी यांची कारकीर्द श्रीदेवी यांना बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार मानलं जातं. श्री अम्मा यंगर अय्यपन म्हणजेच श्रीदेवी यांचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी झाला. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्ल्याळम चित्रपटातही अभिनय केला आहे. 1967 - वयाच्या चौथ्या वर्षी थुनैवन या तामिळ चित्रपटातून बालकलाकार म्हणून सुरुवात 1971 - वयाच्या आठव्या वर्षी पुम्बाता या मल्ल्याळम चित्रपटासाठी केरळचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राज्य चित्रपट पुरस्कार 1975 - वयाच्या 12 व्या वर्षी ज्युली या बॉलिवूडपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण. 1976 - वयाच्या 13 व्या वर्षी मूंद्रू मुदिचू हा तामिळ चित्रपट प्रौढ कलाकार म्हणून पहिला चित्रपट मानला जातो. 1978 - वयाच्या 15 व्या वर्षी 'सोलवा सावन हा पहिला बॉलिवूडपट श्रीदेवी यांच्या नावाचा खरा गवगवा झाला तो 1983 साली प्रदर्शित झालेल्या हिम्मतवाला चित्रपटानं. जीतेंद्र आणि श्रीदेवी या जोडीनं मग मवाली, मकसद, जस्टिस चौधरी असे एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिले. कमल हासनसोबतच्या सदमा या चित्रपटातल्या श्रीदेवी यांच्या अभिनयाला समीक्षकांकडून कौतुकाची पावती मिळाली. मग चांदनी, लम्हे, मिस्टर इंडिया, खुदा गवाह, नगिना, चालबाज यासारख्या चित्रपटांमधल्या भूमिकांनी हिंदी चित्रपटांच्या दुनियेत त्यांचं एक वेगळं वलय निर्माण झालं. मिस्टर इंडिया या चित्रपटातल्या एका नृत्यानं त्यांना मिस हवाहवाई हे टोपणनाव मिळवून दिलं होतं. गाजलेले चित्रपट 1983- सदमा 1983- हिम्मतवाला 1983- जस्टिस चौधरी 1983- मवाली 1983- कलाकार 1984- तोहफा 1986- नगिना 1986- आग और शोला 1986- कर्मा 1986- सुहागन 1987 - औलाद 1987 - मिस्टर इंडिया 1989 - निगाहे (नगिना भाग 2) 1989 - चांदनी 1989 - चालबाज (सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर) 1991 - फरिश्ते 1991 - लम्हे (सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर) 1992 - खुदा गवाह 1992 - हीर रांझा 1993 - रुप की रानी चोरों का राजा 1993 - गुमराह 1993 - चंद्रमुखी 1994 - लाडला 1997 - जुदाई जुदाई चित्रपटानंतर 15 वर्षांचा ब्रेक 2004 - सहारा वन चॅनलवर मालिनी अय्यर या दैनंदिन मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री 2008 - फॅशन मॉडेल म्हणून पदार्पण. लॅक्मे फॅशन वीक मधून रॅम्पवर पाऊल 2012 - गौरी शिंदे दिग्दर्शित इंग्लिश विंग्लिश चित्रपटातून श्रीदेवींनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं. 2017 - 'मॉम' हा अखेरचा चित्रपट गेल्याच वर्षी श्रीदेवी यांच्या चित्रपट कारकीर्दीला 50 वर्ष पूर्ण झाली. 'मॉम' हा त्यांचा तीनशेवा चित्रपट अखेरचा ठरला. शाहरुख खानच्या आगामी 'झिरो' चित्रपटाचं शूटिंग त्या करत होत्या. श्रीदेवी यांची गाजलेली 15 गाणी ऐ जिंदगी, गले लगा ले (सदमा) गोरी तेरे अंग अंग मे (तोहफा) मै तेरी दुश्मन (नगिना) हवाहवाई (मि. इंडिया) काटे नही कटते  (मि. इंडिया) ना जाने कहा से आई है (चालबाज) नैनो मे सपना (हिम्मतवाला) मेरे हाथों मे (चांदनी) रंग भरे बादल से... चांदनी (चांदनी) मोरनी बागा मां (लम्हे) मेरी बिंदिया (लम्हे) मै रुप की रानी तू चोरों का राजा (रुप की रानी चोरों का राजा) तू ना जा मेरे बादशाह (खुदा गवाह) प्यार प्यार करते करते (जुदाई) नवराई माझी (इंग्लिश विंग्लिश)
संबंधित बातम्या :
प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबईत निधन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MP Prajwal Revanna : शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
Yavatmal News : लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
M K Madhavi in Police Custody :  ठाकरे गटाला धक्के सुरुच, एम के मढवी अडचणीत वाढ, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
ठाकरे गटाला धक्के सुरुच, एम के मढवी अडचणीत वाढ, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
PSL गाजवणारा हिरो IPL मध्ये झिरो, मुंबई इंडियन्सच्या ल्यूक वूडच्या नावावर नकोसा विक्रम, दिल्लीकडून जोरदार धुलाई
PSL गाजवणारा हिरो IPL मध्ये झिरो, ल्यूक वूडच्या नावावर नकोसा विक्रम, मुंबई इंडियन्सच्या महागडच्या बॉलर्सच्या यादीत टॉपवर 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 5 PM  : 28 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut : मोदींच्या अंगात औरंगजेब संचारला, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाणाSahil Khan Arrest : साहिल खानला महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अटकLok Sabha 2024 : लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MP Prajwal Revanna : शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
Yavatmal News : लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
M K Madhavi in Police Custody :  ठाकरे गटाला धक्के सुरुच, एम के मढवी अडचणीत वाढ, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
ठाकरे गटाला धक्के सुरुच, एम के मढवी अडचणीत वाढ, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
PSL गाजवणारा हिरो IPL मध्ये झिरो, मुंबई इंडियन्सच्या ल्यूक वूडच्या नावावर नकोसा विक्रम, दिल्लीकडून जोरदार धुलाई
PSL गाजवणारा हिरो IPL मध्ये झिरो, ल्यूक वूडच्या नावावर नकोसा विक्रम, मुंबई इंडियन्सच्या महागडच्या बॉलर्सच्या यादीत टॉपवर 
Mumbai Crime : बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश; तब्बल 14 बालकांची विक्री, एका डाॅक्टरसह 7 जण गजाआड
बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश; तब्बल 14 बालकांची विक्री
प्रत्येक वेळी माझा बाप मारला, बाप मारला, अरे काय लावलंय? तानाजी सावंतांचा ओमराजे निंबाळकरांवर पुन्हा घणाघात
प्रत्येक वेळी माझा बाप मारला, बाप मारला, अरे काय लावलंय? तानाजी सावंतांचा ओमराजे निंबाळकरांवर पुन्हा घणाघात
'सहानुभूतीसाठीच काहींकडून कट कारस्थान', प्रकाश शेंडगेंच्या आरोपावर मनोज जरांगेंचे चोख प्रत्युत्तर
'सहानुभूतीसाठीच काहींकडून कट कारस्थान', प्रकाश शेंडगेंच्या आरोपावर मनोज जरांगेंचे चोख प्रत्युत्तर
Supriya Sule on Ajit Pawar : मलिदा गँग गेल्यापासून गर्दी वाढली; खासदार सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना खोचक टोला
मलिदा गँग गेल्यापासून गर्दी वाढली; खासदार सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना खोचक टोला
Embed widget