(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Actress Oviya Responds To Trolls: प्रायव्हेट VIDEO लीक झाल्यानंतर 'बिग बॉस' फेम अभिनेत्री झाली ट्रोल; सडेतोड उत्तर देत म्हणाली, "पुढच्या वेळी..."
Actress Oviya Responds To Trolls: तमिळ आणि मल्ल्याळम सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ओविया सध्या तिच्या प्रायव्हेट व्हिडीओ लीक प्रकरणामुळे चर्चेत आहे. दरम्यान, ओवियाचं खरं नाव हेलेन नेल्सन आहे.
Actress Oviya Responds To Trolls: फिल्म इंडस्ट्रीमधील (Film Industry) एका प्रसिद्ध अभिनेत्री प्रायव्हेट व्हिडीओ लीक (Private Video Leak) प्रकरणामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर (Social Media) तिचा प्रायव्हेट व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहे. दरम्यान, सोशल मीडिया युजर्सकडून हा व्हिडीओ डीपफेक (Deepfake Video) असल्याचा दावा केला जात आहे. तर, या व्हिडीओवर आतापर्यंत अभिनेत्रीनं कोणताही खुलासा केलेला नाही. पण, अभिनेत्रीनं नुकताच तिच्या इन्स्टा अकाउंटवरुन एक फोटो शेअर केला. त्या फोटोखाली एका युजरनं आक्षेपार्ह्य कमेंट करत अभिनेत्रीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्यावर अभिनेत्रीनं त्या ट्रोलरला खडे बोल सुनावले आहेत.
तमिळ आणि मल्ल्याळम सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ओविया सध्या तिच्या प्रायव्हेट व्हिडीओ लीक प्रकरणामुळे चर्चेत आहे. दरम्यान, ओवियाचं खरं नाव हेलेन नेल्सन आहे. ओवियानं पृथ्वीराज सुकुमारन अभिनीत मल्याळम चित्रपट 'कांगारू' मधून अभिनय पदार्पण केलं. 10 वर्षांनंतर तिला 'बिग बॉस तमिळ सीझन 1' चा भाग बनण्याची संधी मिळाली, तेव्हा तिची लोकप्रियता दुप्पट झाली. त्यानंतर हा शो कमल हसन होस्ट करत होते. आता अभिनेत्री तिच्या एका खाजगी व्हिडीओमुळे चर्चेत आहे.
इंटरनेटवर व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये अभिनेत्री आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहे. अनेक सोशल मीडिया युजर्सनी हा डीपफेक व्हिडीओ असल्याचा दावा केला आहे. तर ओविया किंवा तिची टीम या वादग्रस्त प्रकरणावर थेट भाष्य करण्याचं टाळत आहे. ओवियानं शनिवारी, 12 ऑक्टोबर रोजी इंस्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला, ज्याच्या कमेंट सेक्शनमध्ये एका नेटिझननं तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आणि तिला व्हायरल होत असलेल्या तिच्या खासगी व्हिडीओचा आणखी एक पार्ट शेअर करायला सांगितलं. अभिनेत्रीनं ट्रोलरला थेट उत्तर देताना कमेंटमध्ये लिहिलं की, "पुढच्या वेळी नक्की भाऊ." मात्र, तिनं तिच्या इंस्टाग्रामवरील पोस्टखालच्या कमेंट्स ऑफ केल्या आहेत. कमेंट्सचे स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल केले जात आहेत.
दरम्यान, ओवियानं 2009 मध्ये 'नालाई नामधे'मधून तमिळ सिनेमामझ्ये डेब्यू केला होता. त्यानंतर तिनं 'सिल्लानु ओरू संदिप्पू', 'यामिरुक्का बायमी', 'हॅलो नान पेई पेसुरेन', 'मुथुक्कू मुथागा' आणि 'गणेश मींडम संथिपोम' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्री शेवटची 2024 तमिळ कॉमेडी नाटक बूमर अंकलमध्ये दिसली होती, ज्यामध्ये तिनं एक विशेष भूमिका केली होती. ओवियानं आपल्या करिअरच्या सुरुवातीला मल्याळम चित्रपटांमध्ये सपोर्टिंग रोल्स साकारले होते. 'कांगारू' (2007) व्यतिरिक्त तिनं 'पुथिया मुखम' (2009), 'अपूर्व' (2008) सारखे चित्रपट केले. त्याला 'कालावणी' (2010) साठी दिग्दर्शक सरगुनम यांनी संपर्क केला होता. तिचा ऑनलाईन फोटो पाहून दिग्दर्शकानं तिची मुख्य भूमिकेसाठी निवड केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
"VIDEO लीक करेन..."; शाहरुख खानचा लेक आर्यन खान अनन्या पांडेला 'ब्लॅकमेल' करायचा, नेमकं घडलेलं काय?