एक्स्प्लोर
रजनीकांत यांची कन्या पुन्हा लग्नाच्या बेडीत
दिग्दर्शक-निर्माती सौंदर्या रजनीकांत पुन्हा लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. 35 वर्षीय अभिनेता विशगन वनांगमुडीसोबत सौंदर्या लगीनगाठ बांधणार आहे.
मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची कन्या, दिग्दर्शक-निर्माती सौंदर्या रजनीकांत पुन्हा लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. सौंदर्या वयाच्या 34 व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार असल्याच्या चर्चा वर्षाच्या सुरुवातीपासूनच सुरु होत्या. अखेर सौंदर्याने ट्विटरवर फोटो शेअर करत यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
35 वर्षीय अभिनेता विशगन वनांगमुडीसोबत सौंदर्या 11 फेब्रुवारीला लगीनगाठ बांधणार आहे. त्याने गेल्याच वर्षी मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं. विशगन हा चेन्नईतील फार्मास्युटिकल कंपनी अॅपेक्स लॅबचे संस्थापक एस एस वनांगमुडी यांचा मुलगा आहे. विशगनचंही याआधी लग्न झालं होतं, मात्र हा विवाह फार काळ टिकला नाही.
सिल्क साडीतला दागिन्यांनी मढलेला फोटो सौंदर्याने ट्वीट केला आहे. 'ब्राईड मोड' 'वन वीक टू गो' 'वेद विशगन सौंदर्या' असे काही हॅशटॅग्ज तिने दिले आहेत. शनिवारीच सौंदर्याच्या आई लता रजनीकांत यांनी 10 आणि 12 फेब्रुवारीला आपल्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्याची विनंती करणारं पत्र पोलिस स्टेशनला लिहिलं होतं.
सौंदर्याने बिझनेसमन अश्विन रामकुमार यांच्यासोबत 2010 मध्ये एका भव्य सोहळ्यात लग्नगाठ बांधली होती. मतभेद वाढल्यामुळे सौंदर्याने डिसेंबर 2016 मध्ये फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. जुलै 2017 मध्ये तिला घटस्फोट मंजूर झाला. सौंदर्या-अश्विन यांना वेद हा चार वर्षांचा मुलगा आहे. 2010 साली 'गोवा' या चित्रपटाची निर्मिती सौंदर्याने केली होती. कोच्चडियन चित्रपटातून सौंदर्याने दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं होतं. कोच्चडियन हा भारताचा पहिला फोटोरिअॅलिस्टीक मोशन कॅप्चर चित्रपट होता. सौंदर्या ग्राफिक डिझायनरसुद्धा आहे. तिने दिग्दर्शन केलेल्या 'व्हीआयपी 2' या चित्रपटात तिच्या मोठी बहीण ऐश्वर्याचा नवरा - अभिनेता धनुष आणि काजोल मुख्य भूमिकेत होते.#OneWeekToGo #BrideMode #Blessed 😊😊😊🙏🏻🙏🏻🙏🏻 #VedVishaganSoundarya #Family ❤️❤️❤️ pic.twitter.com/fJYkHp8J1l
— soundarya rajnikanth (@soundaryaarajni) February 4, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement