एक्स्प्लोर
रजनीकांतची धाकटी मुलगी सौंदर्याला घटस्फोट मंजूर
चेन्नई : सुपरस्टार रजनीकांत यांची धाकटी कन्या सौंदर्याचा अखेर घटस्फोट झाला आहे. बिझनेसमन पती अश्विन रामकुमारपासून काडीमोड घेण्यासाठी सौंदर्याने डिसेंबर 2016 मध्ये फॅमिली कोर्टात अर्ज केला होता.
गेल्या सात महिन्यांपासून दोघंही वेगळे राहत होते. दोघांनी जुळवून घेण्याची तयारी न दर्शवल्यामुळे अखेर कोर्टाने त्यांना घटस्फोट मंजूर केला आहे. सौंदर्या-अश्विन यांना वेद हा दोन वर्षांचा मुलगा आहे. त्याच्या कस्टडीबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.
सौंदर्या आणि अश्विन रामकुमार यांनी 2010 मध्ये एका भव्य सोहळ्यात लग्नगाठ बांधली होती. लग्नाला राजकारण, चित्रपट आणि बिजनेस क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
सुपरस्टार रजनीकांतच्या मुलीचा कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज
कोच्चडियन चित्रपटातून सौंदर्याने दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं होतं. सौंदर्या ग्राफिक डिझायनरसुद्धा आहे. काहीच दिवसात तिने दिग्दर्शन केलेला व्हीआयपी 2 हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तिच्या मोठ्या बहिणीचा नवरा, अभिनेता धनुष आणि काजोल मुख्य भूमिकेत आहेत. मतभेद होत असल्यामुळे परस्पर संमतीने घटस्फोट घेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. दोघांमध्ये पटत नसल्याचं सप्टेंबर महिन्यातच समोर आलं होतं. त्यानंतर घटस्फोटाच्या विचारात असल्याचं सांगत तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याचा आदर राखण्याचं आवाहन केलं होतं.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
भविष्य
भारत
कोल्हापूर
Advertisement