एक्स्प्लोर
कॅन्सरवरील उपचारांनंतर सोनाली बेंद्रे मायदेशी परतणार
अभिनेत्री सोनाली बेंद्रे लवकरच भारतात परतणार आहे.
मुंबई : अभिनेत्री सोनाली बेंद्रे लवकरच भारतात परतणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोनाली अमेरीकेत कॅन्सरवरील उपचार घेत आहे. आज इन्स्टावर भावनिक पोस्ट लिहून सोनाली बेंद्रेने मायदेशी परतणार असल्याची माहिती दिली आहे.
अभिनेत्री सोनाली बेंद्रे गेल्या दोन महिन्यांपासून अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवरील उपचार घेत आहे. दरम्यानच्या काळात सोनालीने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केल्या. आजही सोनालीने इन्स्टावर एक फोटो टाकून भारतात परतणार असल्याची माहिती दिली.
दुरावा आपल्याला खूप काही शिकवतो. घरापासून दूर राहिल्यानंतर मला हे जाणवलं की मला अनेक लोकांच्या गोष्टी समजल्या. सर्वजण आपलं जीवन वेगवेगळ्या पद्धतीने रेखाटण्याचा प्रयत्न करतात. सोबतच सर्वजण संघर्षही करत आहेत. कुणीही हार मानत नाही. अशी पोस्ट सोनालीने इन्स्टावर लिहिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement