एक्स्प्लोर
कॅन्सरशी लढा देणाऱ्या सोनाली बेंद्रेचा मुलासोबतचा फोटो इन्स्टावर
"कॅन्सरबाबत सांगितल्यानंतर रणवीरने ते खूप समजूतदारपद्धतीनं घेतलं आणि लगेचच तो माझ्या ताकदीचा आणि सकारात्मकतेचा महत्वाचा स्त्रोत झाला. काही वेळातर त्यानं माझ्या पालकत्वाची भूमिका घेतली."
मुंबई : अभिनेत्री सोनाली बेंद्रेने कॅन्सरचं निदान झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती दिली. मग ते तिचे लांब केस कापणं असो की कॅन्सर झाल्याची बातमी चाहत्यांना कळवणं असो. आताही सोनालीनं एक नवा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत सोनालीसोबत तिचा 12 वर्षांचा मुलगा रणवीर बेहल आहे.
या फोटोत सोनालीने लहान केस केल्याचं स्पष्ट दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सोनालीने मुलाला तिच्या आजाराबद्दल सांगतानाच्या भावना मांडल्या आहेत. त्यात सोनालीने तिच्या मुलाने कॅन्सरची गोष्ट कशी पचवली आणि आता तो तिची कशी काळजी घेतोय, हे मांडलं आहे.
सोनालीने पत्रात काय म्हटलंय?
“12 वर्ष, 11 महिने आणि 8 दिवसांपूर्वी जन्माला आलेला माझा मुलगा रणवीर बेहल यांनं जन्मताच माझ्या हृदयाचा ताबा मिळवला. तो जन्मल्यापासून त्याचा आनंद आणि समाधान हे माझ्या आणि पती गोल्डी बेहलच्या आयुष्याचं लक्ष्य राहिलं. त्यामुळे जेव्हा सी (कॅन्सर) सारख्या रोगानं माझ्या शरिरात डोकं वर काढलं, तेव्हा त्याला कसं सांगायचं या संभ्रमावस्थेत होतो. परंतु आम्हाला जसं त्याला सुरक्षित ठेवायचंय, तसंच आम्हाला त्याला संपूर्ण सत्यही सांगायचं होतं. आम्ही नेहमीच त्याच्याशी मोकळेपणानं आणि खरं बोललोय, त्यामुळे यावेळीही काही वेगळं होणार नव्हतं. कॅन्सरबाबत सांगितल्यानंतर त्यानं ते खूप समजूतदारपद्धतीनं घेतलं आणि लगेचच तो माझ्या ताकदीचा आणि सकारात्मकतेचा महत्वाचा स्त्रोत झाला. काही वेळातर त्यानं माझ्या पालकत्वाची भूमिका घेतली आणि मला काय करणं गरजेचं आहे, त्याची आठवण करुन दिली. मला वाटतं मुलं असणं ही मोठी भाग्याची गोष्ट आहे.”
.@GOLDIEBEHL #SwitchOnTheSunshine #OneDayAtATime 🤞🌞 pic.twitter.com/YgtIrRuhmQ
— Sonali Bendre Behl (@iamsonalibendre) July 19, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement