एक्स्प्लोर
ऑलिम्पिकमधील मुलींच्या यशानंतर सोनाक्षी नव्या भूमिकेच्या तयारीत

मुंबई: रिओ ऑलिम्पिकमधील महिला खेळाडूंच्या यशाने साऱ्यांनाच भुरळ पाडली आहे. बॉलिवूडचेे दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्रींनीही रिओ ऑलिम्पिकमधील महिला खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले. सोनाक्षी सिन्हाही या रेसमध्ये मागे नव्हती. 'अकिरा'सारखा अॅक्शन चित्रपट केल्यानंतर आता खेळावर आधारित चित्रपट करण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे.
'सावधान इंडिया'या टीव्ही शोच्या सेटवर तिने आपला मानस व्यक्त केला.''मी शाळा आणि महाविद्यालयीन जीवनात अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. हॉलीबॉल, बास्केटबॉल पोहणे, गोळाफेक, थाळीफेकसारखे क्रीडा प्रकार आवडतात. मी एक उत्तम खेळाडू आहे,'' असे ती यावेळी म्हणाली.
''जर मला एखाद्या खेळावर आधारित चित्रपट करण्याची संधी कोणी दिली, तर तो मी करेन,'' अशी इच्छा तिने बोलून दाखवली. सध्या ती इतर खेळांच्या तुलनेत टेनिस आणि हॉलीबॉलला वेळ देत असल्याचे तिने यावेळी सांगितले.
सोनाक्षीचा 'अकिरा' हा चित्रपट 'मौना गुरु' या तमिळ चित्रपटाचा रिमेक असून, हा चित्रपट 2 सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. सध्या सोनाक्षी 'नूर' आणि 'फोर्स 2' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
















