एक्स्प्लोर
Advertisement
'जेम्स बाँड' अभिनेते सर रॉजर मूर यांचं कर्करोगाने निधन
झुरिच, स्वित्झर्लंड : जेम्स बाँड साकारणाऱ्या कलाकारांपैकी अनेक चाहत्यांचे लाडके असलेले हॉलिवूड अभिनेते सर रॉजर मूर यांचं निधन झालं. वयाच्या 89 व्या वर्षी कर्करोगाशी लढताना त्यांची प्राणज्योत मालवली.
कर्करोगाशी दिलेल्या अत्यल्प आणि शूर लढ्यानंतर रॉजर मूर कालवश झाले, असं मूर कुटुंबीयांनी ट्विटरवर जाहीर केलं. 'आम्ही हादरलो आहोत' अशी प्रतिक्रिया त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
मूर यांनी स्वित्झर्लंडमध्ये अखेरचा श्वास घेतला. मोनॅको शहरात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.
https://twitter.com/sirrogermoore/status/867005447018086400
'लिव्ह अँड लेट डाय', 'द स्पाय व्हू लव्ह्ड मी' यासारख्या सात बाँडपटांमध्ये मूर यांनी मुख्य भूमिका साकारली होती. ते सर्वात दीर्घ कालावधीसाठी बाँड साकारणारे अभिनेते आहेत. 1972 ते 1986 या 14 वर्षांच्या काळात ( 5 हजार 118 दिवस) त्यांनी जेम्स बाँड साकारला होता.
सर रॉजर मूर यांनी बाँड साकारलेले चित्रपट
लिव्ह अँड लेट डाय (1973)
द मॅन विथ द गोल्डन गन (1974)
द स्पाय व्हू लव्ह्ड मी (1977)
मूनरेकर (1979)
फॉर युअर आईज ओन्ली (1981)
ऑक्टोपसी (1983)
अ व्ह्यू टू अ कील (1985)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement