एक्स्प्लोर
सिद्धार्थ-जॅकलीनच्या किसला सेन्सॉर बोर्डाकडून 70 टक्के कात्री
'अ जेंटलमन' चित्रपटाला यूए सर्टिफिकेट हवं असल्यास त्यातील किसींग सीन 70 टक्क्यांनी कमी करावा, असं पहलाज यांनी निर्मात्यांना सांगितल्याचं वृत्त आहे.
मुंबई : सेन्सॉर बोर्डाने बाहेरचा रस्ता दाखवण्यापूर्वी पहलाज निहलानी यांनी सिद्धार्थ मल्होत्रा-जॅकलिन फर्नांडिसच्या सिनेमावर कात्री चालवली होती. 'अ जेंटलमन' चित्रपटातील सिद्धार्थचा किस अनावश्यक असल्याचं सांगत निहलानी यांनी किसींग सीनची लांबी कमी करण्यास सुचवलं होतं.
'अ जेंटलमन' चित्रपटाला यूए सर्टिफिकेट हवं असल्यास त्यातील किसींग सीन 70 टक्क्यांनी कमी करावा, असं पहलाज यांनी निर्मात्यांना सांगितल्याचं वृत्त आहे. सिद्धार्थ आणि जॅकलीनमधला लांबलचक स्मूच अनावश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
सिनेमाचं नाव 'अ जेंटलमन' आहे, मात्र किस करताना हिरोला त्याचा विसर पडल्याचं निहलानी म्हणाले. हा सीन
चित्रपटात उगाचच घुसवला आहे. हिरोने किस करताना आपल्या मर्यादा सोडल्याचंही सेन्सॉर बोर्डाने म्हटलं.
यापूर्वी जेम्स बाँड सीरिजमधल्या 'स्पेक्टर' चित्रपटातील डॅनिएल क्रेगच्या किसला आणि 'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटातील अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूरच्या किसिंग सीनला सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement