एक्स्प्लोर

Shreyas Talpade: श्रेयस तळपदेला रुग्णालयातून डिस्चार्ज, 'त्या संध्याकाळी नेमकं काय घडलं?' पत्नी दीप्तीने सांगितलं

Shreyas Talpade: श्रेयसला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. श्रेयसची पत्नी दीप्ती तळपदेनं नुकतीच एक पोस्ट शेअर करुन श्रेयसच्या हेल्थची माहिती दिली आहे. 

Shreyas Talpade:  अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade)  काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर श्रेयसला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. आता श्रेयसला डिस्चार्ज मिळाला आहे. श्रेयसची पत्नी दीप्ती तळपदेनं नुकतीच एक पोस्ट शेअर करुन श्रेयसच्या हेल्थची माहिती दिली आहे. 

दीप्तीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "अविश्वसनीय सपोर्टसाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करत आहे. तुमचे संदेश माझ्यासाठी आधारस्तंभ आहेत. मी कदाचित वैयक्तिकरित्या प्रत्येकाला वैयक्तिक रित्या मेसेज करु शकत नसेल, परंतु प्रत्येकाचे मनापासून धन्यवाद"

दीप्ती म्हणाली, "त्या संध्याकाळी तो माझ्यासोबत होता"

पुढे दीप्तीनं पोस्टमध्ये लिहिलं, "माझे जीवन, श्रेयस, घरी परतले आहे. तो आता सेफ हे. मी विश्वास कुठे ठेवावा हे मला कळत नाहीये, असं म्हणत मी श्रेयसशी वाद घालत होते. आज मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळालं आहे आहे, याचं उत्तर सर्वशक्तिमान देव असं आहे. आमच्या आयुष्यात ही भयानक घटना घडली त्या संध्याकाळी तो माझ्यासोबत होता. यापुढे  अस्तित्वावर कधी प्रश्नचिन्ह निर्माण होईल असे मला वाटत नाही. मी आमच्या शहरातील चांगल्या लोकांचे आभार मानू इच्छिते. त्या संध्याकाळी मी मदतीसाठी हाक मारली आणि मला त्यापैकी 10 जणांनी मदत केली. श्रेयस गाडीच्या आत पडून होता, त्या लोकांना माहित नव्हते की,  ते कोणाला मदत करत आहेत. तरीही ते धावत आले.  आमच्यासाठी ते लोक त्या संध्याकाळी देव अवतार होऊन आले. धन्यवाद. मला आशा आहे की, माझा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचेल.  मी  तुमची सदैव ऋणी राहीन. हेच मुंबई शहराचं स्पिरिट आहे. "

"मी मित्र, कुटुंब आणि मराठी आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीचे आभार मानते.  त्यापैकी काही जण ते करत असलेले सर्व कामे सोडून माझ्यासोबत उभे होते. तुम्हा सर्वांमुळे मी एकटी नव्हते. माझ्याकडे धीर देण्यासाठी खांदे आणि मजबूत राहण्यासाठी आधार देणारी लोकं होती", असंही दीप्तीनं पोस्टमध्ये लिहिलं.

View this post on Instagram
 
A post shared by Deepti Shreyas Talpade (@deeptitalpade)

दीप्तीनं या पोस्टमधून श्रेयसवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे देखील आभार मानले आहे. तसेच या पोस्टमधून तिनं श्रेयसच्या चाहत्यांचे देखील आभार मानले.

संबंधित बातम्या:

Shreyas Talpade Health Update : श्रेयसची प्रकृती सुधारतेय, तुमच्या शुभेच्छांची गरज आहेच, पण... : दिप्ती तळपदेचं चाहत्यांना भावनिक आवाहन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget